चोर चोर मौसेरे भाई



हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील मौजे सरसम येथील शालेय पोषण आहाराच्या अपहार प्रकरणातील दोषी मुख्याद्यापक यांना पाठीशी घालण्याचा प्रकार हिमायतनगर पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी व गटशिक्षण अधिकारी यांच्याकडून होत असल्याने शिक्षण विभागाची संशयास्पद भूमिका पाहता चोर चोर मौसेरे भाई असल्याचे दिसून येत आहे.

याबाबत सविस्तर असे कि, सरसम जी.प.शाळेतील मुख्याध्यापक श्री देशमुख हे दि.१३ ऑगस्ट २०१४ रोजी सायंकाळी ०७ वाजता शालेय पोषण आहाराचे चार पोते तांदूळ, दोन पोते तुरीची दाळ, दोन पोते मटकी, व एक पोते वाटणा. असे ऑटोने घरी घेऊन गेल्याचे समजल्याने गावातील जागरूक नागरिकांनी याची तक्रार गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे केली होती. त्यावरून चौकशी अधिकारी पवार यांनी चौकशी केली आणि अकलेचे तारे तोडल्याचे चौकशी अहवालावरून दिसून येते आहे. या प्रकरणी चौकशी अधिकारी पवार यांचा अहवाल सांगतो कि, मुख्याद्यापक देशमुख यांनी शालेय पोषण आहारच माल घरी नेला. हे सत्य असून, तो दुरुस्त करून शाळेत आणणार होतो असे मुख्याद्यापक सांगत असले तरी जागरूक नागरिकांनी विचारणा केली म्हणून बरे झाले. विचारले नसते तर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून हा माल परस्पर लांबविण्याचा इरादा मुख्याद्यापक शिक्षण विस्तार अधिकारी व गटशिक्षण अधिकारी यांचा असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

तक्रार झाली म्हणून चौकशीचा फार्स करण्याचा हा आटापिटा असल्याचे सदरच्या अहवालावरून समजून येत आहे. चौकशी अहवालात पवार म्हणतात शालेय पोषण आहाराचा माल मुख्याद्यापकाने घरी नेला व तो ग्रामस्थांच्या नजरेत पडल्यामुळे शाळेत परत आणून ठेवला. यावरून तो नजरेत पडला नसता तर काळ्या बाजारात गेला असता हे ते तत्वतः मान्य करतात. यावरून शालेय पोषण आह्राचा माल काळ्या बाजारात नेण्याच्या उद्देशाने तो मुख्याद्यापाकाने घरी नेला होता आणि त्यास गटशिक्षण अधिकारी आडणी विस्तार अधिकारी पवार यांचे सहकार्य असल्याने त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा शिक्षण विभागाच्या संशयास्पद भूमिकेच्या विरुद्ध जावून उपोषण करणार असल्याचे गोविंद गोखले, वसंत गोडसेलवार यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी