आरक्षण - के.शंकर



हिमायतनगर(अनिल मादसवार)अनेक दिवसपासून प्रलंबित असलेली रेल्वे आरक्षणाची मागणी आज अखेर पूर्ण झाली असून, हिमायतनगर रेल्वे स्थानकावर प्रवाश्यांना आता आरक्षण करता येणार आहे. तसेच बुकिंग क्लार्कची सुद्धा नेमणूक करण्यात आली असून, आगामी नोव्हेंबर पासून कर्तव्यावर हजार होणार आहे. दि.२६ रोजी मुख्य व्यवसाय निरीक्षक के. शंकर यांनी हिमायतनगर भेटीत सुरुवात करून पत्रकारांना हि माहिती दिली. 

हिमायतनगर रेल्वे स्थानक हे विदर्भ - मराठवाडा आणि तेलंगणाच्या सीमेवर वसलेले आहे. या ठिकाणाहून दूर -दूरवर जाणारे व्यापारी व भाविक - भक्त प्रवाश्यांची नेहमीच वर्दळ असते. एवढे असताना देखील या ठिकाणी मुंबई, तिरुपती, मद्रास, नागपूर, पाटणा, पुणे, सुरत, हैद्राबाद, यासह अनेक पर्यटन व धार्मिक स्थळाला जाणार्या नागरिकांना रेल्वे आरक्षण मिळविण्यासाठी नांदेड, भोकर, किनवट, आदी ठिकाणी जावे लागत होते. त्यामुळे येथील रेल्वे स्थानकावर प्रवाश्यांना आरक्षण मिळावे अशी अनेक दिवस पासून प्रवाश्यांनी मागणी केली होती. हिमायतनगर शहर हे चांगली बाजारपेठ असून, येथील परमेश्वर देवस्थान तीर्थ क्षेत्र असल्याने सर्वदूर ख्याती पसरल्याने अनेक भक्तगण दर्शनसाठी रेल्वे सुविधा असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ये - जा करतात. परंतु आरक्षणाअभावी प्रवाश्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. किंवा सुविधा केंद्रावरून आरक्षण मिळविण्यासाठी अधिकचा भुर्दंड सोसावा लागत होता. हि बाब व प्रवाश्यांची अनेक दिवसाची मागणी लक्षात घेता रेल्वे विभागाने आता हिमायतनगर स्थानकावरून रेल्वे आरक्षण सुविधा सुरु केली आहे. यामुळे प्रवाश्यांची आर्थिक अडचण थांबणार असल्याने प्रवाशी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे. 


अजूनही अनेक सुविधांचा अभाव 
-------------------------------- 
गत अनेक वर्षापासून हिमायतनगर रेल्वे स्थानकावर मुलभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे महिला - पुरुष वर्गाना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. प्रवाश्यांसाठी शौच्चालय व मुतारीची व्यवस्था नसल्याने प्लाटफॉर्मवर लघुशंकेसाठी आडोसा शोधावा लागतो. तर प्रतीक्षा ग्रह हे बारमाही कुलुपबंद अवस्थेत असल्याने प्रवाश्यांना बाकड्यावर व स्थानकातील ओट्यावर आराम करावा लागतो आहे. समान व पार्सलची सोय उपलब्ध नसल्याने सामानाची वाहतूक करण्यासठी जोखीम पत्करावी लागत आहे. प्लॉट फॉर्म वर ये - जा करण्यासाठी पादचारी (उड्डाण) पूल नसल्याने अनेक प्रवाश्यांना रेल्वेपट्टी पार करताना आपला जीव गमवावा लागला आहे. गत अनेक दिवसापासून रेल्वे स्थानावाकावरील बहुसंख्य प्रकाश दिवे बंद असल्याने रात्रीला प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना चोरटे, लुटारूंचा सामना करावा लागत आहे. यामुळे प्रवाश्यातून रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारावर नाराजी व्यक्त केल्या जात आहे. या बाबीकडे रेल्वे अधिकार्यांनी लक्ष द्यावे अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी