रक्तदानाचे कार्य अमुल्य

हिमायतनगर(अनिल मादसवार)रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे, युवकांनी राबविलेल्या रक्तदानाच्या उपक्रमातून गरजू रुग्णांना व अपघात ग्रस्तांना जीवदान मिळू शकते. युवकांकडून केले जाणारे हे आदर्श कार्य अमुल्य आहे असे मत शिवसेनेचे युवा नेते तथा विधानसभा निवडणुकीचे संभाव्य उमेदवार नागेश पाटील यांनी व्यक्त केले. ते हिमायतनगर येथील बजरंग गणेश मंडळाच्या वतीने आयोजित महारक्तदान शिबिरास दिलेल्या भेटी प्रसंगी बोलत होते. तसेच यावेळी त्यांनी युवकांच्या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक करून सतत असे समाजउपयोगी कार्यक्रम राबिण्याचे आवाहन करून राक्तादांच्या उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या.

येथील श्री बजरंग गणेश मंडळाला या वर्षी सहा वर्ष पूर्ण झाले असून, सतत येथील युवकांच्या माध्यमातून गणेशोत्सव पर्वकाळात महाप्रसाद सामजिक व सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध उपक्रम राबविले जातात. आज दि.०५ शुक्रवारी आयोजित रक्तदान शिबिरात शहर व ग्रामीण भागातील हिंदू - मुस्लिम - बौद्ध तरुणांनी रक्तदान करण्यासाठी गर्दी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सदर शिबिराचे उद्घाटन तालुक्याचे दंडाधिकारी श्री शरद झाडगे यांच्या हस्ते करण्यात आले असून, या प्रसंगी परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शिबिराच्या सुरुवातीला तालुक्यातील कारंजी, धानोरा येथील कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. त्यानंतर शिबिराची सुरुवात झाली, शिबारातील युवकांनी दान केलेल्या रक्ताचा साठा करण्यासाठी जनकल्याण साखळी आणि वैद्यकीय सेवा संलग्नित श्री गुरु गोविन्दसिंघजी सेवा प्रतिष्ठान संलग्नित गोळवलकर गुरुजी रक्त पेढी व अर्बनब्लड बैन्केचे डॉक्टर व त्यांच्या सहकार्यांनी मेहनत घेतली.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी तहसीलदार झाडके, पो.नि.अनिलसिंह गौतम, गजानन तुप्तेवार, महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून युवकांनी सुरु केलेल्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी गजानन तुप्तेवार, ज्ञानेश्वर शिंदे, रामभाऊ ठाकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळू चवरे, राजीव बंडेवार, मुन्न जन्नावार, विजय वळसे, मिलिंद जन्नावार, कमलाकर दिक्कतवार, विजय नरवाडे, अन्वर खान पठाण, फेरोजखान युसुफखान, उदय देशपांडे, हानुसिंग ठाकुर, सरदार खान, संतोष गाजेवार, गुंडाळे सर, विठ्ठलराव वानखेडे, रमेश पळशीकर, डॉ. माने, डॉ. दिलीप माने, खंडू चव्हाण, रामदास रामदिनवार, विलास वानखेडे, अनिल मादसवार, पांडुरंग गाडगे, कानबा पोपलवार, दत्ता शिराने, अशोक अनगुलवार, वसंत राठोड, आदींसह शेकडो रक्तदाते, पोलिस कर्मचारी, गणेश मंडळाचे युवक उपस्थित होते. सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी बजरंग गणेश मंडळाचे गजानन चायल, विशाल राठोड, गजानन मांगुळकर, कुणाल राठोड, आशिष जैन, राहुल नरवाडे, गोपी डोईफोडे, मारोती सूर्यवंशी, शंकर ताटीकुंडलवाड, बालाजी मंडलवाड, योगेश चीलकावर, गजानन मुत्तलवाड, सुरज दासेवार, ज्ञानेश्वर बास्टेवाड, रवि शिंदे, आदींसह शहरातील गणेश मंडळ व बजरंग दलाच्या युवकांनी परीश्रम घेतले.

रक्तदान शिबिरात महिलांचाही सहभाग
------------------------------------
येथील बजरंग गणेश मंडळाच्या वतीने आयोजित महारक्तदान शिबिरात शालेय मुली व जैन समाजाच्या महिलांनी रक्तदान करून शिबिराला प्रतिसाद दिल्याने सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

शिबिरात ५०० हून अधिक पिशव्या रक्तदान
-----------------------------------------------
शहरातील पोलिस स्थानकासमोरील श्री बजरंग गणेश मंडळाच्या वतीने आयोजित महारक्तदान शिबिरास युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, सायंकाळी वृत्त लिहीपर्यंत ५०० हून अधिक युवकांनी व महिला - मुलीनी रक्तदान केल्याची माहिती गणेश मंडळाचे आयोजकांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना दिली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी