महारक्तदान शिबिराचे आयोजन

बजरंग गणेश मंडळाच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन 

हिमायतनगर(वार्ताहर)बजरंग दलाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या बजरंग गणेश मंडळाच्या युवकांनी प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी दि.०५ शुक्रवारी महारक्तदान शिबिराचे आयोजन केले असून, या कार्यक्रमाचे उद्घाटन नागेश पाटील आष्टीकर यांच्या उपस्थितीत विभाग संघटक कृष्णाजी देशमुख यांच्या हस्ते केले जाणार आहे.

मागील अनेक वर्षपासून शहरातील पोलिस स्थानकासमोरील दक्षिणमुखी मारोती मंदिरात बजरंग दलाच्या युवकांकडून गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. उत्सवादरम्यान रक्तदान शिबीर घेण्यात येउन विसर्जनाच्या दिवशी भव्य महाप्रसादाचे वितरण केले जाते. यावर्षी सुद्धा दि.०५ शुक्रवारी  सकाळी ११ वाजता भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हदगाव कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सभापती तथा आगमी विधानसभा निवडणुकीतील संभाव्य उमेदवार नागेश पाटील आष्टीकर हे राहणार आहेत. तर शिबिराचे उद्घाटन श्री कृष्णाजी देशमुख यांच्या केले जाणार आहे. कार्यक्रमास विश्व हिंदू परिषदेचे किनवट जिल्हा मंत्री अनिरुद्ध केंद्रे, विहिपचे जिल्हाध्यक्ष मछलावाड, पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम, परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, प्रकाश तुप्तेवार, बाळू चवरे, राम राठोड, विजय वळसे, यांच्यासह अनेक गावातील मान्यवर, सराफा असोशियांचे व्यापारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास जास्तीत जास्त संखेने उपस्थित राहून रक्तदानाचे पुण्यप्राप्त करावे असे आव्हान हिमायतनगर शहरातील सर्व गणेश मंडळ, बजरंग गणेश मंडळाचे पदाधिकार्यांनी नांदेड न्युज लाईव्हच्या वतीने करण्यात आले आहे.

गतवर्षी या गणेश मंडळाने ४५१ पिशव्या रक्तदान करून जिल्ह्यात विक्रमी नोंद केली होती, यावर्षी ७०० च्या हून अधिक पिशव्या रक्तदान करण्याचा संकल्प मंडळाच्या युवकांनी केला असून, यासाठी शहर व ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात युवक सामील होणार असल्याची माहिती गजानन चायल, विशाल राठोड, गजानन मंगूळकर, योग्सेह चिलकावार, कुणाल राठोड, यांच्यासह मंडळाच्या पदाधिकार्यांनी दिली आहे.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी