अभियंत्याचा मुजोरपणा



हिमायतनगर(वार्ताहर)येथून जवळच असलेल्या मौजे सरसम येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्याचा मुजोरपणा वाढला असून, नागरिकांच्या सदरील अभियंत्याच्या वागणुकीविषयी तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर असे कि, सरसम शाखेच्या वीज वितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या मौजे टेंभी येथे गावातील विद्दुत खांबावरील जिवंत विद्दुत तार दि.०४ सप्टेंबर च्या रात्री तुटून पडली. तर रस्त्यावर पडली असताना अपघात होऊन जीवित हानी होण्याची दाट शक्यता असल्याने या संबंधीची माहिती गावातील नागरिकांनी सरसम ३३ क.व्ही.कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता श्री पाटील यांना भ्रमणध्वनीवर कळवून तार जोडून देण्याची विनंती केली. मात्र अभियंत्याने नागरिकांची समस्या सोडविण्याचे सोडून तुम्ही तुमच्या लाईनमनला सांगा..याचे मला काही देणे घेणे नाही..मला काय येथे फार दिवस नौकरी करायची नाही तुम्ही तुमच बघून घ्या असे उर्मट पानाची भाषा वापरली असल्याने नागरिकांनी अश्या बेजबाबदार अभियंत्याचा कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. जबाबदार अभियंत्याला कर्तव्याचे भान नसल्याचे यावरून दिसून आले आहे.

सध्या गौरी - गणेशोत्सवाची धामधूम सर्वत्र चालू असताना वीज वितरण कंपनीने सतर्क राहून नागरिकांना सुविधा पुरवाव्यात अश्या सूचना पोलिस निरीक्षकांनी शांतता कमेटीच्या बैठकीत दिल्या होत्या. परंतु सुचनेचे पालन तर सोडाच महावितरण अभियंत्याच्या उर्मटपणा दिसून आल्याने अश्या अभियंत्यास सभ्यपणा शिकविण्याचे काम खुद्द जनतेलाच करावा लागेल कि काय..? अश्या प्रतिक्रिया साम्सेच्या गर्तेत सापडलेल्या टेंभी वासियातून उमटल्या आहेत. या प्रकाराकडे वरिष्ठांनी या बेजबाबदार व उर्मट भाषा वापरणाऱ्या अभियंत्यास शिस्त लाऊन नागरिकांच्या समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी