मराठवाडा मुक्ती संग्रामदिन साजरा

श्रमदानातून युवकांनी स्वच्छ केला स्मशान भूमी परिसर 

हिमायतनगर(वार्ताहर)येथील स्मशान भूमी परिसराचा नागरिकांनी श्रमदानातून स्वच्छता अभियान राबवून सफाई केली आहे. 

हिमायतनगर शहरातील हिंदू स्मशान भूमी राजकीय नेत्यांच्या दुर्क्षाने अजूनही विकासाच्या प्रतीक्षेत आहे. अनेकदा विकास करून सुरक्षेसाठी संरक्षण भिंत उभारण्याची मागणी नागरिकांनी केली होती. मात्र याकडे पुढार्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने स्मशान भूमी परिसराची दुरवस्था झाली आहे. ग्रामपंचायतीच्या नाकर्तेपणामुळे सदरील स्मशान भूमीत तरोटा, गावात, फुटलेल्या काचेच्या बाटल्या व दुर्गंधीयुक्त साहित्य मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. हिमायतनगर येथील युवकांनी कोणत्याची पुढार्याच्या अथवा ग्रामपंचायतीच्या मदतीची वाट न पाहता युवकांनी हिरीरीने सहभागी होत श्रमदान करून स्मशान भूमीचा सर्व परिसर स्वछतामय करून टाकला. श्रमदानासाठी विलास वानखेडे, गजानन हरडपकर, खंडू चव्हाण, दिलीप शिंदे, नंदू हेंद्रे, बालाजी जाधव, प्रकाश सावंत,  आदींसह अनेक युवकांनी पुढाकार घेऊन सामाजिक जबाबदारी पार पडल्याने त्यांच्या सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. 

ग्राम स्वच्छता अभियानातून मराठवाडा मुक्ती संग्रामदिन साजरा


हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील मौजे वडगाव ज.येथील शालेय व्यवस्थापन समितीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून गावात ग्राम स्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेचा संदेश दिला आहे. 

शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून गावातील घाण रस्ते झाडून स्वच्छ करण्यात आले. यात गावातील नागरिकांनी उघड्यावर शौच्चास जाऊन गावाचा परिसर अस्वच्छ केल्यामुळे सर्वत्र दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले होते. हि बाब लक्षात घेऊन घावातील मुख्य रस्ते संत गाडगे बाबा यांच्या स्वच्छतेचा संदेश घराघरापर्यंत पोचून स्वच्छतेचे महत्व नागरिकांच्या लक्षात आणून दिले. तसेच गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी घरो - घरी शौच्चालय बांधणे महत्वाचे असल्याचे सांगितले. यात शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयप्रसाद तदकुले, सदस्य आनंद तुप्पेकर, संतोष लिंगमपल्ले, महेश ताडकुले, सतीश मोहिती, मुख्याध्यापक परमेश्वर बनसोडे, शिक्षक एम.जे.गायकवाड, सहशिक्षक आर.बी.पांचाळ यांनी स्वच्छता अभियान राबविण्यात सहभाग नोंदविला होता.

मतदार जनजागृतीने मराठवाडा मुक्ती संग्रामदिन साजरा 
हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील मौजे टेंभी येथे मतदार जागृतीसाठी विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन प्रभात फेरी काढून मुक्तीसंग्राम दिन साजरा केला आहे.

राजकारांच्या तावडीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांचे स्मरण व अभिवादन करण्यासाठी दि.१७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. ग्राम पंचायत कार्यालय टेंभीसह तालुक्यातील सर्वच शाळा, महाविद्यालये, शासकीय निमशासकीय कार्यालये येथे सकाळी ध्वजारोहण करण्यात आले.

तहसील कार्यालय हिमायतनगर येथे तालुका दंडाधिकारी शरद झाडके यांच्या हस्ते धावजारोहन  करण्यात आले. तर हिमायतनगर पोलिस स्थानकात पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांच्या हस्ते द्वाजारावहन करण्यात येउन मराठवाडा मुक्ती संग्रामात शहीद झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.

टेंभी येथे ग्रामसेविका सौ.गावित यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर जी.प.केंद्रीय प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक आवारे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. केंद्र प्रमुख भिसे यांनी यावेळी स्वच्छतेचे महत्व पटवून देत गाव हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प नागरिकांनी करावा असे आवाहन केले. तर शौच्चालय बांधकामचे हमीपत्र विद्यार्थ्यांना देऊन घरी शौच्चालय बांधण्याचा पालकांकडे आग्रह करावा असे ग्रामसेविका गावित यांनी सांगितले. यावेळी शिक्षक सरपंच, उपसरपंच, तंटा मुक्त अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.     

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी