ग्रामसेवक गजाआड

800 रूपयांची लाच घेणारा ग्रामसेवक गजाआड


नांदेड(प्रतिनिधी)नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी 800 रूपयांची लाच घेणाऱ्या उंचेगाव ता.हदगाव येथील ग्रामसेवकास लाच लुचपत विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले आहे. 

उंचेगाव बु.ता.हदगाव येथील एका व्यक्तीने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली की,त्यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या उंचेगाव येथील घराचे बांधकाम करायचे होते आणि त्यासाठी ग्रामविकास अधिकारी तथा ग्रामसेवक व्यंकटराव पांडूरंग कोल्हे हा त्रास देत होता.अखेर लाच घेवून बांधकामाचे नाहरकत प्रमाणपत्र देण्यास तलाठी तयार झाला.16 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास ग्राम पंचायत कार्यालय उंचेगाव येथे बांधकामाचे नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी 800 रूपयांची लाच स्विकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ग्रामसेवक व्यंकटराव पांडूरंगराव कोल्हे यास जेरबंद केले.हदगाव पोलिस ठाण्यात कोल्हेविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्त लिहिपर्यंत सुरू होती. 

या कार्यवाहीत पोलिस अधीक्षक एस.एल.सरदेशपांडे,उपअधीक्षक एम.जी.पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक संजय कुलकर्णी,पोलिस निरीक्षक अशोक गिते,कर्मचारी सय्यद साजीद,दत्तात्रय वडजे,बाबू गाजुलवार,मारोती केसगीर आणि चालक शिवहार किडे यांनी सहभाग घेतला. 

मागील काही वर्ष ते हिमायतनगर तालुक्यातील दरेसरसम, हिमायतनगर शहरात कार्यरत असताना अनेक प्रकरणात त्यांनी भ्रष्टाचार केला, असे आरोप करण्यात आले होते. लाच लुचपत विभागाने जनतेला आवाहन केले आहे की,कोणी शासकीय कर्मचारी त्यांना पैशासाठी सतावत असेल तर लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार देवून लाचखोर लोकांना धडा शिकवावा.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी