सात टक्के आरक्षण द्या

हिमायतनगर(बी.आर.पवार)रानावनात राहून गुरा-ढोरावर उपजीविक भागविणाऱ्या तथा आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या बंजारा समाजाला अनुसिचीत जाती- जमाती प्रमाणे स्वतंत्र्य सूची तयार करून सात टक्के आरक्षण देऊन बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आण असे मत बंजारा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष देविदास राठोड यांनी केले.

ते समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी दि.११ रोजी नांदेड येथे काढण्यात येणाऱ्या थाळी, नगर बजाव आंदोलन व मोर्चा संदर्भात हिमायतनगर येथे आयोजित समाज बांधवाच्या बैठकीत बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले कि, देशभरात बंजारा समाजाची १२ कोटी लोकसंख्या आहे. त्यापैकी एकट्या महाराष्ट्र राज्यात जवळपास ०१ कोटी असून, बंजारा समाजाला वेगवेगळ्या भागात बंजारा, लमाण, लामांनी, लुभान, लावणी, आदी नावाने ओळखले जाते. या समाजास इंग्रजी राजवटीने गुन्हेगारी जमात ठरवून छळले आहे. हा समाज वाडी - तांड्यात राहतो. या समाजाला स्वतहाची भाषा, वेशभूषा, संस्कृती देशभरात एकच आहे. तरीसुद्धा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय दृष्ट्या हा समाज अत्यंत मागे आहे. खर्या अर्थाने या समाजाला मुख्य परवाहत आणण्यासाठी शैक्षणिक, नौकरी व राजकीय आरक्षण मिळणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

या मागण्यासाठी येत्या सोमवार दि.११ ऑगस्ट रोजी नांदेड येथे बंजारा समाज बांधवांचा विशाल मोर्चा काढण्यात येउन थाळी नगारा बजाओ आंदोलन करण्यात येणार आहे. यात बंजारा समाजास अनुसूचित जाती - जमाती प्रमाणे केंद्रस्तरावर स्वतंत्र सूची तयार करून शासकीय नौकर्या शैक्षणिक व राजकीय आरक्षण द्यावे. नांदेड गुरुतागद्दी गद्दीच्या धरतीवर बंजारा समजाची काशी म्हणून ओळखल्या जाणार्या तीर्थक्षेत्र पोहरा देवी येथे स्वतंत्र निधी देऊन विकास करावा, महाराष्ट्रातील किमान ३०० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या बंजारातान्द्याना स्वतंत्र ग्रामपंचायत घोषित करावी, वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळास पुरेसा निधी देऊन बंजा युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण कराव्या, तांडा वस्ती विकास योजनेसाठी प्रतीवस्ती २५ लाखाचा निधी द्यावा, उसतोड मजुरांना प्रतीटन २५० रुपये मजुरी द्यावी, नांदेड येथेइल वसंतराव नाईक यांचा पुतळा बसविण्यासंदर्भात पास झालेल्या ठरावाची तत्काळ अंमल बजावणी करावी यासह अन्य मागण्या शासनाकडे केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राम राठोड, परसराम पवार, आशिष सकवान, राजेश राठोड, वसंत राठोड, अनिल पवार, बळवंत राठोड, यांच्यासह बहुसंख्य समाज बांधव, पत्रकार उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी