शेतकऱ्याचा मृत्यू

हिमायतनगर(अनिल मादसवार)ऐन पोळ्याच्या दिवशी नाल्याला आलेल्या पुराने कारला पी.येथील एका शेतकऱ्याच्या पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची घटना २५ च्या रात्री १० वाजता उघडकीस आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि, दि.२५ सोमवारी कोरड्या दुष्काळाचे सावट असताना सुद्धा बळीराजा आनंदाने अन्नदात्याच्या उत्सव पोळासन साजरा करण्यासाठी तयारीला लागला होता. सायंकाळी ५ वाजता पोळा असल्याने शेत चक्कर मारून येण्यासाठी शेतकरी दगडू पांडुरंग मोरे वय वर्ष ४० हे गेले होते. शेतातून निघण्यापूर्वी सायंकाळी ४ वाजताच हिमायतनगर तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर ओसरताच घराकडे येत असताना रस्त्यावरील चिंतावार नाल्याला मोठा पूर आला होता. पोळ्याच्या मिरवणुकीचा वेळ होता असल्याने घाई गडबडीत नाला पारकरताना पुराचा जोराने शेतकरी वाहून जाऊन त्यांचा मृत्यू झाला. पोळ्याची वेळ झाली तरी शेतकरी घरी आले नाहीत म्हणून घरच्यांनी सर्वत्र शोधाशोध केली मात्र नाल्याचा पूर ओसरेपर्यंत शेताकडे जाने जमले नाही. रात्रीला पुन्हा पाऊस कमी झाल्यावर शोध घेतलि असता, हिमायतनगर - ते कारला पी. या पांदन रस्त्यावर शेतकऱ्याचा मृतदेह पालत्या अवस्थेत आढळून आला.

या बाबतची माहिती पोलिसांना कळताच रात्रीला पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात मयताचे शवविच्छेदन करण्यात येउन प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दि.२६ रोजी सकाळी १२ वाजता मयत शेतकऱ्याच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात कारला येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्याच्या पश्चात पत्नी,२ मुली २ मुले असा परिवार आहे. पोळ्याच्या सणाच्या दिवशी शेतकऱ्यावर निसर्गाचा कोप झाल्याने परिवारावर दुखाचा डोंगर कोसळलं आहे. यातून सावरण्यासाठी शासनाने शेतकऱ्याच्या कुटुंबियांना नैसर्गिक आपत्ती निवारणाच्या योजनेतून तातडीची मदत द्यावी अशी मागणी हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी वर्गातून केली जात आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी