बाप्पाचे स्वागत

हिमायतनगरात गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात बाप्पाचे स्वागत 


हिमायतनगर(वार्ताहर)रेल्वे, ट्रक्टर, टेम्पोने शहरात आलेल्या बाप्पा गणेशाचे शहरातील बाल -गोपाल व युवकांनी ढोल ताशा व गणपती बाप्पा मोरया...च्या गजरात जल्लोषात स्वागत केले. तसेच मंगल वाद्य व पुरोहिताच्या मंत्रोच्चार वाणीत श्रीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यावेळी शहर व ग्रामीण परिसर गणेशाच्या जयघोषाने निनादून गेले. तर वरून राजानेही गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला व प्रतिष्ठापनेनंतर जोरदार हजेरी लाऊन बाप्पाचे स्वागत केल्याने शेतकरीहि आनंदात गणेशोत्सवात सामील झाले आहेत. 

भाद्रपद शुक्ल ४ दिनांक २९ सोमवारी अवघ्या देशभरात गणरायाचे आगमन झाले असून, गणरायाच्या स्वागतासाठी अनेक दिवसापासून दडी मारलेल्या वरून राजाने पूर्वसंध्येला व स्थापनेच्या दिवशी हजेरी लाऊन गणेशाचे जोरदार स्वागत केले आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर विघ्नहर्ता श्री गणेशाची मूर्ती खरेदीसाठी बाल -गोपलानी एकाच गर्दी केली होती. तालुक्यातील हजारो गणेश भक्त शहरात दाखल होऊन ट्रक्टर, ऑटो, जीप, दुचाकी, हाथगाडे, बैलगाडीसह अन्य वाहनाने गणेशाला आपल्या गावी प्रतिष्ठापना स्थळी घेऊन जातानाचे चित्र दिसून आले. गणेशोत्सव काळातील ११ दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात गणेश मुर्त्या विक्रीचे स्टाल, काळलावीची फुले, फळे, यासह उपवासासाठी लागणारे व सजावटीच्या साहित्याने बाजारातील दुकाने फुलल्याचे दिसून आले आहे.    

तसेच शहरातील कनकेश्वर तलावाच्या काठावर वसलेल्या इच्छापूर्ती वरद विनायक गणेश मंदिरात नांदेड न्युज लाइवह्चे संपादक तथा पत्रकार अनिल मादसवार यांच्या हस्ते सपत्निक दुग्ध व जलाभिषेक करण्यात येउन श्रीची स्थापना पुरोहिताच्या मंत्रोचार वाणीत झाली.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी