ओबीसीचा लाभ मिळून द्यावा

मूळ दासरी समाजाच्या नावातील चुकांची दुरुस्ती करून ओबीसीचा लाभ मिळून द्यावा  



नांदेड(प्रतिनिधी)सबंध महाराष्ट्रात दासरी समाजाची संख्य केवळ तीन ते साढेतीन हजार एवढी आहे.  परंतु दासरी समाजातील जातीच्या नावातील चुकांमुळे हा समाज ओबीसी प्रवर्गात असूनही शासकीय लाभापासून वंचित आहे. याकडे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लक्ष देऊन वंचित समाजाला न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.

सबंध महाराष्ट्रात दासरी समाज अल्पसंख्यांक असून, अशिक्षित व आडणी आहे. हा समाज १९५० पासून (ओबीसी) इतर  मागास प्रवर्गामध्ये समाविष्ठ आहे. परंतु याचा कोणताही लाभ या समाजाला मिळत नाही. कालांतराने १९८० नंतर याद्यातील काना, मात्रा, वेलांटी, आदी चुकांमुळे दासारीचे दासर झाले आहे. त्यामुळे हा दासरी समाज ओबीसी च्या आरक्षणाशी जोडला गेला नाही. खरे पाहता दासरी / दासर / माला दासरी / होला दासरी आम्ही सर्व एकच आहोत. सावांची रोटी- बेटी, व्यवहार सुरळीत चालू आहे. परंतु हा समाज दोन आरक्षणामध्ये विभागल्या गेल्यामुळे कोणत्याच आरक्षणाचा लाभ मिळत नाही. त्यामुळे हा समाज शासनाच्या सर्व लाभांपासून वंचित आहे. या समाजाकडे शासनाने लक्ष देऊन दासरी समजला ओबीसी या एकाच  प्रवर्गात समाविष्ठ करून लाभ मिळवून द्यावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे आ.माधव पाटील जवळगावकर यांच्याकडे करण्यात आली आहे. गुरुवारी नांदेड येथे मुख्यमंत्र्यांना भेटून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी निवेदन कर्त्यांना दिले आहे. यावेळी मुरहारी यंगलवार, रामराव मादसवार, नरसिंगा मादसवार, चंद्रकांत मादसवार, गोविंद गोडसेलवार, अनिल मादसवार, प्रशांत बोम्पीलवार, सोपान बोम्पीलवार, काशिनाथ पोरजवार, गजानन अल्लडवार आदींसह अनेकांची उपस्थिती होती.   

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी