स्वातंत्र्य दिन

ठिकठिकाणी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा 

हिमायतनगर(वार्ताहर)शहरातील सर्वच शासकीय- निमशासकीय कार्यालयात १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा ध्वज फडकवून जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आले.

सर्वात प्रथम येथील पोलिस स्थानकात पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांच्या हस्ते सकाळी ७.०५ वाजता तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर राष्ट्रगीताने मानवंदना देण्यात आली. यावेळी शहरातील अनेक मान्यवर नागरिक, पत्रकार व पोलिस कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर ग्रामपंचायतीत सरपंच गंगाबाई शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तहसील कार्यालयात तहसीलदार श्री मंतावार यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता ध्वजारोहण पार पडले. तसेच शहरासह तालुक्यातील शाळा, कोलेज, महाविद्यालय, बैंका, संस्था, यासह अनेक ठिकाणी शांततेत ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी अनेक मान्यवर, नागरिक, कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते.

रक्तदान शिबिराने स्वातंत्र्य दिन साजरा 


हिमायतनगर(वार्ताहर)रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान आहे, म्हणून तीन महिन्यातून एकदा तरी प्रत्येकाने रक्तदान करावे असे आवाहन पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांनी केले. ते शहरातील डॉक्टर व मेडिकल असोशियनच्या वतीने महात्मा फुले सभागृहात १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराप्रसंगी मागदर्शन करताना बोलत होते. 

शिबिराची सुरुवात तथा उद्घाटन गौतम यांच्या हस्ते धन्वंतरी देवीच्या पूजनाने करण्यात आली. या प्रसंगी मंचावर नांदेड न्युज लाइव्हचे संपादक अनील मादसवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.गायकवाड,  डॉ. चव्हाण,  डॉ. असोशियनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, मेडिकल असोशियानाचे प्रमुख झिय्या भाई आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, रक्तदानाचा हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येतो हि बाब अभिनंदनीय आहे. विज्ञानाने मानवी जीवनात कितीही प्रगती केली तरी रक्ताला दुसरा कोणताच पर्याय नाही. आपण डोनेट केलेले रक्त हे एखाद्या रुग्णाचे  प्राण वाचवू शकते. संकटातील व्यक्तीला सहकार्य केल्याचे पुण्य रक्तदात्याला मिळते. सध्या सर्वत्र रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण होत आहे. मात्र काही लोकांना रक्तदान  करण्याबाबत शंका निर्माण होते, परंतु रक्तदान केल्याने कोणताही अशक्तपणा येत नसून, त्यामुळे उलट आपल्या शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण होते. म्हणून कोणतीही भीती न बाळगता प्रत्येकाने तीन महिन्यातून एक वेळा तरी रक्तदान करून समाजसेवेचे कर्तव्य पार पाडावे असे आवाहनही त्यांनी केले. रक्तदान शिबिरात रक्त संकलनाचे कार्य गुरु गोविंदसिंघ ब्लड बैन्केचे डॉक्टर जयदीप हजारी, महेंद्र अटकोरे, उज्वला, कपिल, सचिन, मोहन, गणेश यांनी पार पडले. सायंकाळ पर्यंत ७७ महिला - पुरुष नागरिकांनी रक्तदान केले. यावेळी डॉक्टर असोशियनचे डॉ. गणेश कदम, डॉ. प्रसन्न रावते, डॉ. प्रसाद डोंगरगावकर, डॉ.दिलीप माने, डॉ.दिगंबर वानखेडे, डॉ.पावणेकर, डॉ.ढगे, डॉ.शेवाळकर, डॉ.मुक्कावार, मेडिकल असोशियनचे प्रभाकर चव्हाण, वानखेडे, शिवकुमार गांजरे, किसन कदम, संदीप पाटील, बंडू गायकवाड, आदींसह अनेकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अमोल पेन्शनवार यांनी मानले.   

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी