भक्तांचा हिरमोड



हिमायतनगर(अनिल मादसवार)शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पांडवकालीन तलाव पावसाळ्याचे आडीच महिने संपूनही कोरडच आहे. परिणामी या ठिकाणाचे नैसर्गिक सौंदर्य वाढविणारे कमळपुष्प व पक्षांचे थव्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून, निसर्गनिर्मित्त मनोहारी दृष्य पहावयास मिळत नसल्याने श्रावण मासात व गणेश उत्सव दरम्यान दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांचा व पर्यटकांचा हिरमोड होत आहे.

१९७४ काळातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीत याच कनकेश्वर तलावातील विहिरीच्या पाण्याने शहरवासियांचे तहान भागली होती. या वर्षी ऑगस्ट महिना अर्धा होत असताना देखील पावसाभावी कोरडा तलाव पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. दर वर्षी श्रावण महिन्याच्या आगमनापूर्वीच संदेश देत तलावाची सौंदर्या खुलून दिसत असे, यात उमललेली कमलपुष्प हि येणाऱ्या -जाणार्यांना आकर्षित करीत आसे. याबाबत इतिहासात सांगितले जाते कि, हस्तिनापुर कुरुक्षेत्रात कौरव - पांडवाच्या भीषण युद्धा प्रसंगी पांडवानी माघार घ्यावी लागली होती. त्यावेळी बचावासाठी पांडवानी द्रोपदिसह पूर्वीचे वाढोणा(वारणावती)सध्याचे हिमायतनगर जवळील याच कनकेश्वर तलावाच्या ठिकाणच्या महादेव व वरद विनायक मंदिरात आसरा घेतला होता. या ठिकाणी कीही दिवस राहिल्यावर पांडवानी तलावास चंद्राचा आकार दिला, तसेच या तलावात कमाल पुष्प व बदकाच तसेच अन्य प्राणिमात्राचे पालन पोषण द्रोपदीने केले होते असे जुन्या जन्कारातून सांगण्यात येते.

त्यामुळे येथील पांडव कालीन तलावास विशेष महत्व प्राप्त झाले असून, तेंव्हापासून या तलावास कनकेश्वर तलाव या नावाने ओळखले जाते. आज हे नैसर्गिक सौंदर्य असलेले तलाव पावसाच्या अवकृपेने कोरडे पडले असून, आता या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना कधी चांगला पाऊस पडेल व येथील निसर्ग सौंदर्य पहावयास मिळेल याकडे नजरा लागल्या आहेत.

येथील महादेवाचे मंदिर हे राजकालात गाडल्या गेल्याचे या ठिकाणी सापडणार्या मोठ मोठ्या शिळांच्या अवशेषावरून दिसून येत, आज घडीला या ठिकाणी तलावाच्या काठावर चंद्राच्या बिम्बावर वरद विनायकाचे मंदिर वसलेले असून, दर महिन्यातील चतुर्थी, श्रावण मास, गणेशोत्सव यासह दर शनिवारी भक्तांची गर्दी होते हे विशेष. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी