पातळी साडेपाचशे फुटांवर

हिमायतनगर(अनिल मादसवार)मराठवाड्यात पाऊस झाला नसल्याने कोरड्या दुष्काळाचे सावट असून, पैनगंगा नदी कोरडीठाक पडल्यामुळे नदीकाठावरील अनेक गावातील पाणीपातळी कमी झाली आहे. परिणामी पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. हिमायतनगर परिसरातील पाणीसाठे खोलवर गेल्याने, भूजल पातळी तब्बल साडेपाचशे फुट गेली आहे. महिना उलटून गेला तरी पाऊस पडत नसल्यामुळे जनावरांच्या तोंडचा घास हिरावला जात आहे, परिणामी चारा टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

पाणी पटली खोलवर गेल्यामुळे हिमायतनगर हद्दीमध्ये असलेल्या अनेक भागांना तीन ते चार दिवसांनी पाणीपुरवठा होतो आहे. तर शहर परिसरात असलेल्या अनेक वसाहतींना बोअरच्या पाण्याशिवाय पर्याय नाही. हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागातील बहुतांश भाग हा बोअरवेल्सच्या पाण्यावर अवलंबून आहे. परंतु पैनगंगा नदी आटल्यामुळे पाणी पातळी साडेपाचशे फुटापेक्षा खाली गेली आहे. नुकतेच शहरातील काही ठिकाणी काही खाजगी लोकांनी बोअर घेण्यासाठी प्रयत्न केले, मात्र साडेपाचशे फुट खोल जाऊनही पाणी लागत नाही. त्यामुळे लाखो रुपये खर्च करूनही शहरवासियांना पाणी मिळविणे कठीण झाले आहे. बोअरला पाणी मिळत नाही, ग्राम पंचायत पाणी देत नाही, ज्या ठिकाणचे बोअरवेल चालू आहेत. त्या ठिकाणी रंगाच्या रंग लागतात, भांदेभर पाणी पिलाविण्यासाठी चार चार तास ताटकळत बसावे लागते, मग नागरिकांनी पाणी आणायचे कुठुन असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

शहरामधील बजंग चौक, जनता कॉलनी, लाकडोबा चौक, पोलिस स्थानक, नेहरू नगर यासह अन्य भागात जवळपास साडेतीनशे फुटावर पाणी लागत असल्याची परिस्थती आहे. तर खुद्द ग्रामपंचायतीच्या ३५ बोर पैकी २५ बोर ५५० फुटाचे आहेत. तसेच शहरातील रुखामिनीनगर, परमेश्वर गल्ली, छत्रपति शिवाजी नगर या काही भागांमध्ये पाणीपातळी खोल गेल्यामुळे या भागात तीनशे फुटांपर्यंत खोदल्यानंतरही केवळ ओली माती लागते. यानंतर काही फूट खोदल्यानंतर पाणी लागल्याचे सांगण्यात येते.

सध्या शहरातील पाणी तांची वर मात करण्यासाठी शहरातील आठ ठिकाणच्या विहिरीत २ टैन्कर द्वारे दिवसभरातून प्रत्येकी ४ ते पाच फेर्या करून पाणी टंचाई सोडविण्याचे काम ग्राम पंचायत स्तरावरून चालू असल्याची माहिती आहे.

गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील चारा सदृश्य पिके हाताची गेली होती, काहींनी रब्बीत मका टाकून चार्यचे उत्पादन केले मात्र, गारपिटीच्या तडाख्यात रब्बी ज्वारीचा चारा खराब झाला. तर वादळी वार्यामुळे अनेकांचे ढिगारे उडून गेल्यामुळे चार्याचे उत्पादन घटले आहे. पावसाळा सुरु होऊन महिना उलटल्यानंतरही पाऊस झाला नसल्यामुळे हिरवा चारा उगवला नाही, त्यामुळे चारा टंचाई चा सामना शेतकर्यांना करावा लागत आहे. याचा गंभीर परिणाम दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जनावांवर होत आहे. चारा नसल्यामुळे दुधाचे उत्त्पन्न घटण्याची शक्यता बळावली आहे. ज्या ठिकाणी चारौपालाबाद आहे, त्या ठिकाणी १२ ते १५ रुपयाला कडब्याची पेंडी तर ९ ते१० उपायाला गवताची पेंडी विकत घेऊन दुभत्या जनावरांची भूक भागविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी