हताश शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हिमायतनगर(वार्ताहर)येथील पशुवैद्यकीय रुग्णालयातील जनावरांच्या डॉक्टरांच्या लीला संपता - संपेनात एक झाले कि दुसरा कारनामा समोर येऊ लागल्याने ढोर डॉक्टर आजही आलाच नाही अश्या हताश प्रतिक्रिया म्हैस आजारी असल्याने उपचारासाठी आणलेल्या दुध उत्पादक शेतकर्यांनी दिल्या आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर येथे असलेला पशुवैद्यकीय दवाखाना येथील पशुधन विकास अधिकारी यांच्या अनेक कारनाम्यामुळे चर्चेत आला आहे. गत काही दिवसापासून सदरील डॉक्टर अनेक कारनाम्यांची पोलखोल नांदेड न्युज लाइव्ह आणि वर्तमान पत्रातून झाली असताना हि सदर डॉक्टर महाशयांच्या वर्तनात काडीचाही फरक पडला नसल्याने अनेक शेतकर्यांनी व पशुपालकानी संताप व्यक्त करत सांगून त्यांची येथून हकालपट्टी करण्यात येउन एखादा चांगला अधिकारी द्यावा अशी मागणी केली आहे.

आज दि.०५ शनिवारी टेंभी येथील एका दुध उत्पादक शेतकर्याची म्हैस आजारी पडल्याने आजारावर उपचार करण्यासाठी मोठी कसरत करीत शेतकर्याने दवाखाना गाठला. परंतु या ठिकाणी येतच दाल कुलूप असल्याचे दिसून आले. त्यामुळे शेतकऱ्याच्या संतापात आणखीनच भर पडली. उपचार मिळविण्यासाठी वर्ण उपचारक श्री बोईवार यांच्याशी संपर्क साधला असता ते सुट्टीवर असलाचे समजले. तर पशुधन विकास अधिकारी श्री बिरादार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता मी सकाळी आलो होतो. परंतु कामानिमित्त लवकरच परत निघालो बाकी माल माहित नाही असे म्हणत जबाबदारी झटकण्याचा त्यांनी प्रयत्न केला.मोठ्या उमेदीने दवाखाना गाठून उपचार मिअलल नसल्याने बराच वेळ वात पाहून ढोर डॉक्टर आजही आलाच नाही अशी हताश प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या तोंडून आपसूकच बाहेर पडली...

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी