वाहतूक परवाना हिमायतनगर येथे मिळणार

हिमायतनगर(वार्ताहर)येथील पोलिस स्थानकाचा नव्यानेच पदभार स्वीकारलेले पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांनी रुजू होताच वाहनधारकांना शिस्त लावत मोटारवाहन परवाना नसलेल्या चालकांना परवाना मिळून देण्यासाठी अथक प्रयत्न सुरु केले आहे. आणि एकाच दिवसात त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पाठपुराव्याला फळ मिळाले आहे.

हिमायतनगर तालुका हा तसा मागासलेला तालुका येथे काम करण्यासाठी बरेचशे कर्मचारी आणि अधिकारी नाक मुरडत असतात. परतू येथे नुकतेच रुजू झालेले पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यानी अनेक स्तुत्य कामांची सुरुवात केली आहे. ग्रामीण भागातील अनेक वाहन धारकांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याने गौतम यांच्या धास्तीने अनेक अनुभवी तथा नवशिके चालक शहरात वाहने चालविणे टाळत आहेत. कारण विनापरवाना वाहन चालविता आढळून आल्यास मिळणारा प्रसाद म्हणजे गौतम साहेबांची कार्यवाही या कार्यवाही पोटी अनेक नागरिक वाहन चालविणे पसंद करीत नाहीत. जुन्या ओकेल मिश्रीत इंधनावर चालणार्या गाड्या शहरातून हद्दपार झाल्या आहेत.

विनापरवना वाहन चालवणार्यांना परवाना मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने गौतम यांना विनंती केली होती. त्यांनी यास दुजोरा देत तात्काळ उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांना संपर्क साधून येथे कैम्प लावण्यासंदर्भातील मागणी लाऊन धरली. आज दि.१४ रोजी तातडीने पत्र मेल करण्याचे सांगून हि मागणी मंजूर केली आहे. दि.१५ रोजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व्ही.व्ही.सागरे हे हिमायतनगर येथे कैम्प लावण्यासंदर्भात जागेची पाहणी करण्यासाठी येणार आहेत. त्यानंतर दर महिन्याला एक दिवस येथे वाहन परवाना शिबीर घेण्यासाठी वाहन निरीक्षक यांना पाठविणार आहेत. यामुळे तालुक्यातील वाहनधारकांच्या वेळेसह पैश्याची बचत होऊन हिमायतनगर शहरातच परवाना मिळणार आहे. पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सव स्तरातून कौतुक व आगामी काळात अश्या प्रकारचे अनेक उपक्रम राबून समस्यांचे माहेर घर बनलेल्या हिमायतनगरातील कचरा साफ करवा अशी रास्त अपेक्षा व्यक्त होत आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी