चाहत्यांची गर्दी

हिमायतनगर(वार्ताहर)तब्बल पाच वर्षानंतर हिमायतनगर येथे अनिलसिंह गौतम सारख्या सिंघम नावाने ओळखणार्या कर्तव्यदक्ष पोलिस अधिकार्याची नेमणूक झाल्याने शहरातील चाहत्यांनी स्वागतासाठी एकच गर्दी केल्याचे चित्र दिसून आले आहे. त्यांच्या येण्याने राजकीय वरद हस्ताने शहर परिसरात अवैध्य धंदे चालविणाऱ्या माफियांची मात्र झोप उडाली आहे.

आज सकाळपासूनच त्यांचे हिमायतनगर शहरात आगमन होणार म्हणून जो तो उत्सुकतेने त्यांची वात पाहत होता. सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान शहरात आगमन झाल्याने प्रथम त्यांनी येथील ग्राम दैवत श्री परमेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. तर पोलिस स्थानकात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने शाल पुष्पहाराने जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी प्रकाश शिंदे, प्रकाश कोमावार, देवकते, पुंडलिक कांबळे, राम राठोड, विजय वळसे, विलास वानखेडे, ज्ञानेश्वर शिंदे, बालाजी कात्रे, संजय मादसवार, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सचिव तथा नांदेड न्युज लाइव्हचे संपादक अनिल मादसवार, प्रकाश जैन, कानबा पोपलवार, दत्ता शिराने, परमेश्वर शिंदे, जांबुवंत मिराशे, असद मौलाना, फाहद खान, धम्मपाल मुनेश्वर, संजय मुनेश्वर, शे.इस्माईल, आदींसह शहरातील राजकीय नेते, नागरिक, पोलिस कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते.

अनिलसिंह गौतम यांच्या येण्याचे चर्चेने शहरातील अर्ध्याहून अधिक अवैद्य धंदेवाल्यांनी आपला गाशा गुंडाळला तर आठवडी बाजारात दारू ढोसून गोंधळ घालणार्यांनी तर लवकरच घर गाठल्याचे चित्र शहरात दिसून आले आहे. एवढेच नव्हे तर राजकीय वरद हस्ताने नंबर दोनचे धंदे करणार्यांचे सुद्धा धाबे दणाणले असून, सदरचा अधिकारी येथे राहू नये यासाठी आपल्या नेत्यांच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरु केल्या आहेत. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी