स्वर झंकारच्या सुरात

हिमायतनगर(अनिल मादसवार)आषाढी एकादशीच्या पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आयोजित स्वर झंकार अभंगवाणीच्या कार्यक्रमातील गीतांच्या सुराने उपस्थित श्रोतेगण अक्षरश्या न्हाऊन निघाल्याचा अनुभव हिमायतनगर वासियांना आला आहे. 

प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी येथील श्री परमेश्वर मंदिरात पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला दि.११ शुक्रवारी रात्री ओंकार संस्था पुणे निर्मित्त " स्वर झंकार " हा अभंगवाणी व भक्ती संगीताचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वर झंकारचे संयोजक गायक श्री परमेश्वर तीप्पणवार, तर प्रमुख पाहुणे म्हणून परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ हे होते. तसेच सांस्कृतिक विभागाचे प्रकाश शिंदे, प्रतिष्ठित व्यापारी श्री पांडुरंग तुप्तेवार, परमेश्वर पानपट्टे व इतर नागरिक व श्रोतेगन उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर माउलीच्या मूर्तीला नमन करून संगीत कार्यक्रमास प्रतिष्ठित गायक ज्ञानेश्वर तोशेटवार यांनी " पर्वत जळतील पापाचे ".. आणि " बाजे मुरलिया बाजे "...हि भक्तिरचना सदार करून सवाना मंत्रमुग्ध केले. तसेच स्वर झंकार कार्यक्रमाचे प्रमुख परमेश्वर यांनी पंचपदीतील जय जय विठोबा रखुमाई हि भक्तिरचना सदर करून प्रेक्षकांची दाद मिळविली. तसेच या कार्यक्रमात बोलवा विठ्ठल... पाहावा विठ्ठला...करावा विठ्ठला..जीव भावे..., येवो विठ्ठले...अबीर गुलाल उधळीत रंग...तसेच पेक्षकांच्या आग्रहास्तव दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे... हे भावगीत सदर करून वाहवा मिळविली. कार्यक्रमात तबला मृदंगावर सचिन बोम्पीलवार, कृष्णा बोम्पीलवार, ऑर्गन वादक चंद्रकांत चीद्रावार, हार्मोनियम पोषट्टी यम्मलवाड, यांनी उत्तम साद दिली. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी