बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा

गरिबांना बेघर करत आय. टी.आय.ची टोलेजंग इमारत उभी..

रहिवाशांचे अद्याप पुनर्वसन नाही
बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा 

हिमायतनगर(अनिल मादसवार)शहरातील पळसपूर रस्त्यावर बांधण्यात आलेल्या आय.टी.आय. इमारतीच्या जागेवरील ३८ गरिबांना बेघर करत इमारत बांधण्यात आली असून, येथील मूळ रहिवाशी अजूनही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आय टी आय ची इमरात उद्घाटनापूर्वीच वादाच्या भोवर्यात आली आहे.  

हिमायतनगर शहरात औद्योगिक शिक्षणाची सोय व्हावी या उद्देशाने बांधण्यात आलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीच्या जागी पूर्वी अंदाजित सन १९८५ साली ग्रामपंचायत कार्यालयाने इंदिरा आवास योजने अंतर्गत एकूण ३८ घरकुल बांधून लाभार्थ्यांना वितरीत केले होते. यासाठी तत्कालीन जागा मालक दिगांबर तांबोळी यांनी सदरील जागा स्वखुशीने वस्तीवाड करण्यासाठी ग्राम पंचायत हिमायतनगरला दानपत्र दिल्याचे येथील रहिवाश्यांनी सांगितले. तत्कालीन सरपंच लक्ष्मणराव शक्करगे यांनी येथील गरिबांना घर मिळावे म्हणून मोलाचे सहकार्य केले. परंतु त्यांच्या नंतर स्थापन करण्यात आलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यकारी मंडळाने सदरील वस्तीसाठी कोणत्याही नागरी सुविधा पुरविल्या नाहित. येथील ३८ घरांसाठी केवळ एका हातपंपा शिवाय कोणतीही सोय ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिली नाही. परिणामी येथील नागरिकांना असुविधेच्या गर्तेत आपले आयुष्य वेचावे लागले. यातील लाभार्थी सदाशिव रामराव वानखेडे यांचे वय आज ६० वर्ष आहे. दान म्हणून मिळालेल्या घरात एकदाचा देह टाकावा अशी त्यांची इच्छा.., परंतु उतारवयात ग्राम पंचायतीच्या लालची पदाधिकार्यांच्या स्वार्थी प्रवृत्तीमुळे गरिबांच्या घरावर दोजर फिरवत आर्थिक तडजोड करून आमची हक्काची जागा हडप केल्याचा आरोप या रहिवाश्यांनी केला आहे. या ठिकाणी गोर - गरीब मागासवर्गीय नागरिकांच्या झोपड्या व घरे अस्तित्वात होत्या.  म्हणून पुनर्वसनचा कोणताही विचार न करता ग्राम पंचायतीच्या पदाधिकार्यांनी सदरील जागा गुत्तेदाराच्या घश्यात घातली. 
             
जागा हस्तांतरणात ग्राम पंचायतीची मनमानी

२१ मार्च २००९ च्या गाव नमुना सात अधिकार अभिलेख पत्रकानुसार सरपंच ग्राम पंचायत कार्यालय हिमायतनगर भोगवटादार वर्ग ०१ असलेल्या सर्वे न.४८/२ मधील एक हेक्टर २० आर हि जम्नीन हस्तांतरणासाठी उपमुख्या कार्यकारी अधिकारी (पंचायत) जी.नांदेड यांनी दि.२२ जानेवारी २०१०रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती हिमायतनगर यांना दिलेल्या पत्रात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी कायमस्वरूपी जागा देण्यासाठी नमून न.८ भूमिअभिलेख कार्यालायचा अभिप्राय व पंचायत समिती हिमायतनगर सभेचा ठराव आदी कागदपत्रांची मागणी केल्याचे त्यांच्या पत्रावरून दिसून येते. परंतु सदरील कागदपत्रासंबंधी कोणतेही दस्तावेज जी.प.नांदेड यांना दिल्याचे निदर्शनास येत नसून, केवळ स्वार्थापोटी सदरील जागेचा व्यवहार केला असल्याच्या शंकेला वाव मिळत आहे.       

आय. टी.आय. इमारतीच्या जागेची चौकशीची मागणी

संबंधित इमातीच्या बांधकामासाठी ग्राम पंचायतीने सदर जागा जबरदस्तीने ताब्यात घेतली असून,  या प्रकारची चौकशी करून संगनमताने घरकुलाची जागा हडप करणार्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंदवावेत. अन्यथा १५ ऑगस्ट २०१४ पासून बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे अण्णाभाऊ साठे क्रांतीदल महाराष्ट्र राज्याचे संस्थापक पुरुषोत्तम दादा गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. 

याबाबत ग्रामसेवक शंकर गर्दसवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, म्हणाले कि, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने सदर जागा तत्कालीन सरपंच ग्रामसेवकाने  हस्तांतर केल्याचे सांगितले.    

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी