पाणी टंचाईच्या झळा

हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील मौजे कारला - पिछोंडी गट ग्रामपंचायतीच्या सरपंच - ग्रामसेवकाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे येथील ग्रामस्थांना ऐन पावसाळ्यातही पाणी टंचाईचा सामना करावा लागता आहे.

मौजे पिछोंडी येथे ५०० च्या वर लोकसंख्या असून, सदरचे गाव हे कारला पी.गट ग्रामपंचायतीत येते. या गावाचा कारभार कारला येथील निवासी सरपंच रामेश्वर यमजलवाड व ग्रामसेवक गर्दसवार हे पाहतात. मागील वर्षभरापासून सरपंच महाशयाने पिछोंडी गावात भेट दिलीच नाही. त्यामुळे गावातील समस्यांनी डोके वर काढले आहे. दरवर्षीप्रमाणे पाणी टंचाई च्या काळात विहिरीचे अधिग्रहण करण्यात येते, मात्र यावर्षी विहिरीचे अधिग्रहण केले नसल्यामुळे गावातील पाणी टंचाईने उग्ररूप धारण केले आहे. गावात असलेले बोअरची पाणी पातळी खाली गेल्याने पाईप टाकून त्यातून पाणी काढावे लागत आहे. ते पाणी सर्वाना मिळणे कठीण असल्याने गावातील नागरिकांना भांडेभर पाण्यासाठी ३ ते ४ कि.मी.पर्यंत शेत शिवारात भटकंती करावी लागत असल्याचे भयावह चित्र दिसून येत आहे. हि बाब ग्रामस्थांनी सरपंच महाशयांना हिमायतनगर रस्त्यावर दुचाकी आडून येथील माजी सरपंच भूराजी धनवे यांनी सांगून पाणी टंचाईची समस्या सोडविण्याची मागणी केली. मात्र याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करून गट ग्रामपंचायतीच्या गावास जाणीवपूर्वक पाणी टंचाईसह अन्य समस्येच्या गर्तेत ठेवले आहे. जर नेहमीप्रमाणे अधिग्रहण केले असते तर ग्रामस्थांवर हि वेळ आली नसती, गात वर्षी येथील शेतकर्याने दिलेल्या पाण्यामुळे गावातील नागरिकांची तहान भागली होती असे शेषकलाबाई डुडुळे, धुपाताबाई धनवे, रुखामिनाबाई मिराशे, रामू बेले, नीलाबाई धनवे, लक्ष्मीबाई बनसोडे, कमलबाई धनवे, तानाबाई डुडुळे, मंजुळाबाई देशमुखे, पंजाबी देशमुखे, मंगलाबाई बोडखे, पार्वताबाई डुडुळे, तुळसाबाई बनसोडे, चनगुनबै भिसे, रुखमाबाई बोडखे यांच्यासह शेकडो महिला व पुरुष ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

परिणामी गावातील महिला पुरुषासह अबल वृद्धाना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. या समस्येला कंटाळून येथील दोन तीन ऑटो भरून नागरिकांनी येथील तहसील कार्यालयात दि.०३ गुरुवारी येउन पाणी टंचाईची समस्या मांडून अधिग्रहण किंवा टैकरद्वारे गावकर्यांची तहान भागविण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत सरपंच यमजलवाड यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही, तर ग्रामसेवक गर्दसवार म्हणाले कि, अधिग्रहण साठी प्रस्ताव दिला आहे. मात्र शेतकरी पाणी देण्यास तयार नाही असे त्यांनी सांगितले.

दरवर्षी अधिग्रहण करणाऱ्या शेतकरी नागोराव संभाजी वानखेडे यांना विचारले असता ते म्हणाले कि, मागील वर्षी आधी ग्रहांचे बिल काढण्यासाठी महसूलच्या लोकांनी त्रास देत पाणी वितरण केले नाही असा आरोप करून देयके देण्यास टाळाटाळ केली होती असे ते म्हणाले.

मागील पाच वर्षापूर्वी पिछोंडी येथे १६ लाखाची भारत निर्माण नळयोजना मंजूर झाली होती. यात विहीचे काम करण्यात आले, मात्र अल्प प्रमाणातील पाणी व काम करणाऱ्या तत्कालीन पाणी पुरवठा समितीच्या नाकर्तेपणामुळे सदर योजना अर्धवट अवस्थेत आहे, त्यामुळे गावातील पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी