सबला होऊन जगा..अनिलसिंह गौतम

हिमायतनगर(बी.आर.पवार)विद्यार्थ्यांनी शालेय व महाविद्यालीन जीवनात यश संपादन करण्यासाठी नितांत परिश्रम करून मुलीनी स्पधेच्या युगात अबला होऊन जगण्यापेक्षा सबला होऊन जगा. असे आवाहन पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांनी येथील राजा भगीरथ विद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनींना मागदर्शन शिबिराप्रसंगी बोलताना केले. यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग गाडगे, सल्लागार प्रकाश जैन, सचिव तथा नांदेड न्युज लाइव्हचे संपादक अनिल मादसवार, संघटक कानबा पोपलवार, असद मौलाना, जांबुवंत मिराशे, ज्ञानेश्वर पंदलवार, वसंत राठोड, धम्मपाल मुनेश्वर, ग्रा.प.सदस्य हनुसिंग ठाकूर, गजानन चायल, राम सूर्यवंशी, शकील भाई, शाम ठाकरे, रामदास रामदिनवार आदींची उपस्थिती होती.

दि.२८ सोमवारी येथील राजा भगीरथ विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक अनगुलवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले कि, विद्यार्थी व विद्यार्थीनिनी जीवनात यश संपादन करण्यासाठी नित्य अभ्यास करून स्पर्धात्मक परीक्षणं सामोरे जाण्याची तयारी करावी. भ्रमणध्वनी व दूरदर्शनचा अति वापर टाळावा. स्वदेशी खेळ खो खो, कब्बड्डी, कुस्ती, होलिबॉल, सुरपाट्या आदी खेळावर लक्ष केंद्रित केल्याने शरीरासह बुद्धिमत्तेला सुद्धा प्रोत्साहन मिळते. विज्ञान युगात विद्यार्थीनिनी अनेक क्रांती घडविली असून, थोर माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, माता अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची प्रेरणा घेऊन सबल होऊन जगण्यासाठी प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धी व शक्तीचा वापर समाज व देश हितासाठी करावा असेही ते म्हणाले. विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी खास चीडीमार पथकाची स्थापना करण्यात आली असून, विद्यार्थीनीना सुरक्षा प्रदान करण्यासाठी मी सदैव तत्पर राहील असेही त्यांनी सांगितले. यावेळी प्रा.चौधरी, जी.एम.मुठेवाड, कापसे सर, डी. एल.कोंडामंगल, शंकर नरवाडे, आहीरवाड सर, कमलाकर, दिक्कतवार, के.बी.शन्नेवाड, उत्तरवार मैडम, तीप्पणवार मैडम, आदींसह शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक, नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर उत्तरवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.सुरेश जाधव यानी मानले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी