तलाठ्यांचे धाबे दणाणले..

हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील अवैद्य रेती साठ्यांचे वृत्त नांदेड न्युज लाइव्हने सातत्याने प्रकाशित करताच शेवटी उपविभागीय अधिकारी दीपक घाडगे यांनी दि.०२ जून रोजी पळसपूर, सरसम शिवारात भेटी देऊन पंचनामा केला व अवैद्य रित्या साठविलेले रेती साठे ताब्यात घेतले आणि कार्यवाहीचे आदेश देण्यात आल्याने अवैद्य रेतीचे साठे साठविण्यात आलेल्या साज्जातील तलाठ्यांचे धाबे दणाणले आहे. आज सकाळपासून अनेक तलाठ्यांनी पंचनाम्याचे धाडसत्र सुरु केले.

कोरडीठाक पडलेल्या पैनगंगा नदीतून अवैद्य रित्या साठविण्यात येत असलेल्या रेती साठ्यांमुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसुल, महसूल विभागाचेच कर्मचारी कसे गिळकृत करतात याची तपशीलवार माहिती नांदेड न्युज लाइव्ह या ऑनलाईन पेपर मध्ये प्रकाशित करण्यात आली होती. याची दाखल घेत हदगावचे उपविभागीय अधिकारी दीपक घाडगे यांनी सरसम शिवारातील ३० ब्रास व पळसपूर शिवरात सहा ठिकाणी साठवण्यात आलेल्या १२८ ब्रास रेतीचा पंचनामा करून पोलिस पाटलाच्या ताब्यात देऊन कार्यवाहीचे आदेश दिले होते. सरसम सज्जाचे तलाठी कुलकर्णी व पळसपूर सज्जाचे तलाठी तानाजी सुगावे यांना नोटीस देऊन खुलासा मागविणार असल्याचे सांगून खुलासा येताच कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले होते. त्यांच्या या धडक कार्यवाहीच्या प्रकाराने तलाठी वर्गातील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून, दि.०३ रोजी सकाळपासूनच तलाठ्यांनी पंचनामे करण्याचे धड्सात्राचा सपाटा सुरु केले आहे.

आज गुरुवारी तलाठ्यांनी केलेल्या कार्यवाहीत खडकी बा. येथिल तलाठी मेहुणकर यांनी अवैद्य रेती साठे व ३० ब्रास मुरूम उत्खनन करीत असताना गट न.३० दत्ता गोविंद सूर्यवंशी यांच्या रानात एक जेसीबी व ट्रेक्टर सील करून पंचनामा केला होता. तर वारंगटाकळी येथे ८० ब्रास अवैद्य रेती साठा तलाठी मुंडे यांनी जप्त करून पोलिस पाटील यांच्या ताब्यात दिला असला तरी अनेक रेती साठ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. उपविभागीय अधिकारी घाडगे यांनी तलाठ्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने कुंभकर्णी झोपीचे सोंग घेतलेल्या तलाठ्यांनी अंग झाडत अवैद्य रेती साठा, मुरूम, दगड, यांचा पंचनामा करण्याचा सपाटा चालू केला असून, संभावित कार्यवाहीतुन वाचण्याची धडपड चालविली आहे. तर मेहुन्कर यांनी खडकी बा. येथे ताब्यात घेतलेली एक जे सी.बी. व ट्रेक्टर काही वेळातच उत्खननाच्या जाग्यावरून पसार झाल्याने त्यांची कार्यवाही संशयाच्या भोवर्यात सापडली आहे. याबाबत मेहूणकर यांच्याशी भ्रमण ध्वनिवरून संपर्क साधला असता आवाज येत नसल्याचे कारण सांगत बोलणे टाळले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी