तिसर्यांदा पेरणीला सुरुवात




हिमायतनगर(अनिल मादसवार)मागील अनेक दिवसापासून रुसलेल्या पावसाने तीन दिवसापासून रिमझिम प्रकारे सुरुवात केली असून, दोन वेळा पेरलेली बियाणे वाया गेल्याने काळजावर दगड ठेऊन.. अखेर शेतकर्यांनी तिसर्यांदा पेरणीला सुरुवात करण्याची वेळ आली आहे.

मृग नक्षत्र कोरडे गेले, आर्द्राने दगा दिला, सरते शेवटी आषाढी एकादशीच्या दिनी मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली. मात्र नांदेड जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही, त्यामुळे दोन वेळा पेरणी केलेली बियाणे पावसाभावी कुजून गेली. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला असून, शासनही मदत करीत नाही अश्या प्रतिक्रिया अल्पभूधारक शेतकर्यांमधून पुढे येत आहेत. अश्या परीस्थितीत गत दोन दिवसापासून पावसाचे रिमझिम आगमन झाले असून, पावसाच्या सारी पडत असल्याने बहुतांश बोर- गरीब शेतकर्यांनी उसनवारी, व्याजी दिडी करून बियाणे व खत आणून पेरणीला सुरुवात केली आहे. यावरही वरून राजाने पुन्हा दडी मारल्यास शेतकऱ्यांवर आत्महत्येशिवाय अन्य पर्यायाच उरणार नाही अशी प्रतिकिया काही शेतकऱ्यांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलून दाखविल्या आहे.

आज घडीला ज्यांची ऐपत नाही अश्या गरीब शेतकर्यांनी दोन वेळा पेरणी करूनही पाऊस पडला नसल्याने शेतातील ९० टक्के पिके गेल्याने रान-शिवार काळेकुट्ट दिसत आहेत. यावरून हिमायतनगर तालुक्यातील पिके, चारा, पाणी टंचाईची समस्या किती भीषण आहे, हे दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी नांदेड जिल्ह्यातून हिमायतनगर तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे तालुक्यात पिके उगवालीच नाहीत, बोअर, विहिरी कोरड्याठाक पडल्या असून, चारा टंचाईने सुद्धा उग्ररूप धारण केले आहे. आता तरी शासनाने जागृत होऊन हिमायतनगर तालुका कोरडा दुष्काळ ग्रस्त घोषित करावा, शेतकरी वर्गाना नुकसान भरपाई, वीज बिल माफी, मजुरांच्या हाताना काम द्यावे अशी मागणी जोर धरत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी