आता मिळणार शहरात परवाना

उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून जागेची पाहणी..आता मिळणार शहरात परवाना


हिमायतनगर(वार्ताहर)ग्रामीण भागातील नागरिकांना वाहन चालविण्याचा परवाना मिळावा व पोलिस कार्यवाहीतून नागरिकांची सुटका व्हावी हा उद्देश डोळ्यापुढे ठेऊन सामाजिक हित जोपासणाऱ्या पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांच्या प्रयत्नाने वाहन चालविण्याचा परवाना हिमायतनगर शहरात मिळणार आहे. दि.१७ रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे निरीक्षक एस.बी.जोशी यांनी ( कैम्प)शिबिरासाठी जागेची पाहणी केली आहे. 

येथे नव्यानेच रुजू झालेले पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांनी अनेक स्तुत्य कामाची सुरुवात केली असून, शहरव तालुक्यातील अनेक वाहन धारकांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याने नागरिकांना शिस्त लावण्यासाठी कार्यवाही करणे गरजेचे असून, त्यांची समस्या सोडविणे हि सामाजिक बांधिलकी आहे. असे सांगत शक्य तोवर या महिन्यापासूनच वाहन चालविण्याचा परवाना मिळून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे निरीक्षक जोशी यांनी शहरातील परमेश्वर मंदिर मैदान, तहसील कार्यालय व शासंकीय विश्रामग्रह येथील जागेची पाहणी करून योग्य असणाऱ्या विश्राम गृहातील जागेची निवड काणे योग्यराहील असे सांगितले.  सावजानिक बांधकाम विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र यासाठी मिळणे गाजेचे आहे, ते मिळताच शिबिराची सूवत केली जाईल असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सचिव अनिल मादसवार, उपाध्यक्ष दत्ता शिराने, संघटक कानबा पोपलवार, गंगाधर वाघमारे, असद मौलाना, फाहद खान, राम सूर्यवंशी आदींसह अनेकांची उपस्थिती होती.     

उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा


शहरातच परवाना देण्यासाठी कैम्प लावण्यात येणार असून, याबाबत जागेची पाहणी नंतर  उपविभागिय अधिकारी दीपक घाडगे यांच्याशी आर.टी.ओ. इन्स्पेक्टर एस.बी.जोशी, पो.नि.अनिलसिंह गौतम यांनी चर्चा केली. यावेळी घाडगे यांनी येथील जागेत कैम्प लावण्यास काहीच हाकत नसल्याचे सांगितले. यावेळी प्रभारी तहसीलदार गायकवाड, नायब तहसीलदार संजय देवराय आदीसह, मंडळ अधिकारी, तहसीलदार व अनेक नागरिक उपस्थित होते. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी