मंडळ कृषी अधिकारी नामोहरम

योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोंचेनात
कामे फक्त कागदावरच..
५० लाखाचा भ्रष्टाचार..
कार्यालय रामभरोसे.. 


हिमायतनगर(अनिल मादसवार)मंडळ कृषी अधिकारी कार्यालयातील सुपर पॉवर सुपरवायजर पवार यांच्या राजकीय पॉवर मुळे मंडळ कृषी अधिकारी दावलबाजे नामोहरम झाल्याने एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमातील कामात लाखोचा भ्रष्टाचार होत असल्याची ओरड नागरीकातून होत आहे. 

शासनाने मोठा गाजावाजा करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक पाणलोट विकास अभियान हातही घेतले. सदरील कार्यक्रमाचा शेतकर्यांना फायदा होऊन आर्थिक स्तर उंचावण्याचा शासनाचा जरी प्रयत्न असला तरी शासनाने नियुक्त केलेलेच कर्मचारी पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून आपले उखळ पांढरे करून घेत असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून केला जात आहे. सदरील कार्यक्रमाविषयी नागरिकांना अंधारात ठेऊन एकतर्फी कामाचा सपाटा लावला असून, कागदोपत्री मोठ्या प्रमाणात कामे अरण्यात येत आहेत. अंदाजपत्रकीय मुल्य पायदळी तुडवून पंलोतातील पैश्याचा लोट अधिकारी - कर्मचारी खिश्याकडे वळवीत आहेत असा आरोप दरेसरसम येथील जेष्ठ नागरिक कामाजी रायपलवाड यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना केला आहे. या भागाकडे नियुक्त करण्यात आलेले कृषी सहाय्यक, सुपरवायजर, गावाकडे सहा - सहा महिने फिरकत नसून केवळ कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त असल्याचेही त्यांनी सांगितले. 

येथील मंडळ कुशी अधिकारी श्री दावलबाजे हे केवळ नामधारी असून, सुपरवायजर पवार हेच कार्यालय चालवितात कि काय..? असा सवाल तालुक्यातील शेतकरी विचारीत असून, त्यांच्या पॉवरमुळे कृषी अधिकारी नामोहरम असल्याचे दिसून येत आहे. एकात्मिक पाणलोट विकास कायाक्रमाअंतर्गत कोणती कामे केली जात आहेत याची सविस्तर माहिती देण्यास अधिकायांकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. अनेक कामात मोठ्या प्रमाणात अफरातफर होत असल्याची ओरड नागरिक करीत आहेत. 

तालुक्यातील एका गावात पाणलोट अभियानाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची ओरड होत असताना शहानिशा करण्यासाठी कार्यालयाशी संपर्क साधला असता माहिती घेऊन काय करता..? असा सवाल अधिकारी विचारीत असल्याने सदरील गावात किमान ५० लाख रुपयाचा अपहार झाल्याची चर्चा आहे. २०१२-१३ या वर्षात झालेल्या अपहार प्रकरणी लवकरच एक शिष्टमंडळ वरिष्ठांना भेटून कार्यवाही करण्याची मागणी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली, शेलोडा, एकंबा, सिरंजणी, कोठावाडी, अन्देगाव यासह अनेक ठिकाणी चालू असलेल्या एक्मात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमात येथील शेतकऱ्यांची कृषी खात्यामार्फत मातीबंद, शेती सापतोकरण, नाले बांधकाम, बंधारे बांधकाम, आदी योजनांच्या नावाखाली कृषी अधिकारी दावलबाजे यांच्या संगनमताने शेतकऱ्यांची अथिक लुट करून लाखो रुपये हडप केल्याचे अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. 

कार्यालय रामभरोसे 

शेतकऱ्यांसाठी आलेल्या शासनाच्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोंचत नसून केवळ काही दलालांना हाताशी धरून मर्जीतील लोकांना सग्या- सोयरयाना कृषी विभागाच्या योजनांची खिरापत वाटण्यात येत आहे. तर गरजू लाभार्थी शासनाच्या योजनापासून वंचित राहत आहेत. संकटात सापडलेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी असलेल्या योजना फस्त करण्याचे काम अधिकारी आणि कर्मचारी करीत असून, शेतकर्यांना समधानकारक साधे उत्तरही देण्याची तत्परता अधिकारी दाखवीत नाहीत. केवळ दोन चार कर्मचारी सोडले तर कार्यालयात अधिकारी भेटणे मात्र लाभार्थ्यांच्या नशिबानेच. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी