कुऱ्हाडीने मारहाण

हिमायतनगर(वार्ताहर)शेतातून बैलगाडी का घेऊन जातो असे म्हणत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून दोघांना कुऱ्हाडीने जबर मारहाण केल्याची घटना रमनवाडी शेतशिवारात दि. ०९ बुधवारी दुपारी घडली आहे. या प्रकरणी येथील पोलिस स्थानकात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली सुशील चव्हाण करीत आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील मौजे रमनवाडी येथील अर्जुन धावजी आडे हे रान कोरडे असल्याने मध्य मार्ग शेतातून बैलगाडी घेऊन जात होते. त्यावेळी शेतमालक शिवाजी महादू बिलेवाड याने आमच्या शेतातून बैलगाडी का नेतोस अशी विचारणा केली. यावेळी सध्या रान कोरडे असल्याने नेत आहे, पुन्हा येणार नाही असे सांगितले असताना देखील बिलेवाड यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत महान केली. हा प्रकार पाहून मधुकर रामसिंग आडे सोडविण्यासाठी आले असता त्यांना सुद्धा शिवीगाळ करून आरोपी शिवाजी महादू बिलेवाड, अवधूत महादू बिलेवाड, आडेलू महादू बिलेवाड या तिघांनी संगनमताने कुर्हाडी व काठ्याने मारहाण करून डोके फोडले.

अश्या गंभीर अवस्थेत जखमींनी हिमायतनगर पोलिस ठाणे गाठल्याने आठवडी बाजारच्या दिवशी हे दृश्य पाहण्यासाठी बघ्यांची गाडी जमली होती. या बाबत अजून आडे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून तिघा बिलेवाड बंधूवर हिमायतनगर पोलिस स्थानकात कलम ३२६,३२४,५०४,५०६,३४ भादवी प्रमाणे गुन्हे दाखल कण्यात आले आहेत. जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, ८ ते१० टाके पडल्याचे समजते. मारहाण करणाऱ्या पैकी एका आरोपीस पोलिसांनी अटक केली असून, अन्य दोन आरोपी अटक पूर्व जामीन मिळविण्यासाठी फरार झाले आहेत.

सदर मारहाणीची घटना घडलेल्या दिवशीच अनिलसिंह गौतम यांनी हिमायतनगर पोलिस स्थानकाचा पदभार स्वीकारला होता. त्यामुळे हा गुन्हा तातडीने दाखल करण्यात आला आहे, अन्यथा नेहमीप्रमाणे असे घडलेले गुन्हे पोलिस व आरोपींच्या देवाण घेवाणीतून फिर्यादीवर दबाव आणीत रफा- दफ़ा केल्या गेले असते अशी प्रतिक्रिया स्थानकात उपस्थित नाग्रीकातून ऐकावयास मिळाली आहे.

याबाबत अनिलसिंह गौतम यांच्याशी विचारणा केली असता फरार दोन्ही आरोपींना लवकरच ताब्यात घेऊन, अटक आरोपीची कसून चौकशी केली जात आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी चौकशी अथवा तपासासाठी १४ तारखे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याचे सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी