कोरडा दुष्काळ

नांदेड(खास प्रतिनिधी)पावसाळा सुरु होऊन मृगनक्षत्र गेले आर्द्राची सुरुवात होऊ चार दिवस लोटले, मात्र पाऊस अजूनही बेपत्ता आहे. पावसाभावी शेतकर्यांची स्वप्न भंगली जात असून, पेरण्य खोलळंबल्याने हि दुष्काळ सदृश्य परिस्थितीची चाहूल आहे. गात वर्षी अतिवृष्टीने ओळ दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती मात्र यावर्षी त्याउलट स्थिती आहे. आता कोरडा दुष्काळ जाहिर करण्याची वेळ आली असताना मात्र विकासाच्या नावाने गप्पा मारणारे नेते या बाबत बोलत नसल्याने शेतकर्यांना कोणी वाली आहे कि नाही असा सवाल अन्नदाता विचारीत आहे.

मृगनक्षत्र संपले तरी जिल्ह्यात पेरणीसाठी पुरक पाऊस झाला नाही. ज्या भागात तुरळक पाऊस झाला. त्या भागात केवळ १ टक्के पेरण्या झाल्या. उर्वरीत भागात पाऊस झाला नसल्याने पेरण्या पुर्णपणे खोळंबल्या आहेत. खरीप हंगामघेण्यासाठी शेतकर्‍यांनी खरीप पूर्व मशागतीची कामे अटोपली आहेत. गतवर्षी झालेली अतीवृष्टी आणि त्यातुन झालेले शेतीचे नुकसान लक्षात घेता यावर्षी पाऊस लवकर येईल या आपेक्षेवर शेतकर्‍यांनी मशागतीची कामे लवकरच आटोपली. खते, बी-बियाने खरेदी करून ठेवण्यात आली. याशिवाय शेतीची अवजारेही तयार ठेवण्यात आली. कर्ज काढून, बचेतीला ठेवलेल्या पैशातून पदरमोड करून बियान्यांची खरेदी करण्यात आली. पाऊस वेळेवर झाल्यानंतर आपल्या पेरण्या खोळंबु नयेत यासाठी शेतकर्‍यांनी परिस्थितीशी तोडजोड करून तयारी केली. यावर्षीची लगन सराई त्या मानाने मोठी होती. लगनसराईत शेतीकडची कामे खोळंबु नयेत यासाठी विशेष काळजी घेतली गेली. सोयाबीन, कापुस या नगदी पिकांस झाल्याने शेतकर्‍यांना ते विकत घेणे परवडणार नाही यासाठी शेतकर्‍यांनी आपल्या घरातील सोयाबीनचा बीयाने म्हणुन वापर करावा त्यासाठी आवश्यक त्या बाबी समजुन घ्याव्यात म्हणुन कृषी विभागाने जनजागरण हाती घेतले. ऐवढेच नाही शेतकर्‍यांच्या मदतीला माहिती देण्यासाठी प्रत्येक तालुक्यावर अधिकार्‍यांची नेमणुकर करण्यात आली. प्रत्येक कृषी केंद्रावर माहिती देणारा सक्षमअधिकारी नियुक्त करण्यात आल. सोबत माहिती पत्रकही ठेवण्यात आले.

केवळ बीटी वाणावर अवलंबून न राहता कापूस उत्पादकाने अन्य कंपनीचा कापुस लागवड करावा यासाठीही शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करण्यात आले. गतवर्षी सोयाबीनचे भाव गडगडले होते. परंतु यावर्षी पावसाळ्याच्या तोंडावर सोयाबीनचे भाव वधारल्याने सोयाबीनला चांगले दिवस येतील म्हणुन शेतकर्‍यांने सोयाबीनची लागवड करण्यासाठी सोयाबीनची बियाने खरेदी केले. मुग, उडीद आणि ज्वारी पिकाच्या लागवडीसाठी आवश्यकते प्रमाणे बियाने खरेदी करून रान तयार करण्यात आली. खरीप पुर्व मशागतीची पुर्ण तयारी करून शेतकरी आता आभाळाकडे डोळे लावला आहे. रोणीच्या नक्षत्रात झालेला पाऊस, मृगनक्षात्राच्या पहिल्या चरणात वादळी वार्‍यासह दाखल झालेल्या पावसाने जिल्ह्यातील ८ जणांचा बळी घेतला. बाजारपेठा आणि शासन दरबारी बेदखल झालेला शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे हवालदिल झाला आहे. मृगनक्षत्र संपवुन आर्द्रा नक्षत्र सुरू झाले तरी पाऊस पडला नाही. यामुळे जिल्ह्यातील १६ ही तालुक्यात पेरण्या खोळंबल्या आहेत. गेल्या चार दिवसापासून जे उन पडत आहे त्या उन्हाची तीव्रता मे महिन्यासारखी आहे. आणखी आठ दिवस पाऊस पडला नाही तर जिल्ह्यातील लघु व मध्यमप्रकल्पातील पाणी साठा रसा तळाला जाईल त्यातुन नव्या संकटाला सुरूवात होईल. जिल्ह्यातील एकुणच परिस्थिती कोरडा दुष्काळ सदृष्य असल्याने राज्य सरकारला या बाबतीत विचार करावा लागणार आहे

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी