दुष्काळाचे सावट

हिमायतनगर(वार्ताहर)पावसाने पाठ फिरविल्याने नुकसानीत आलेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई एन्यत यावी या मागणीसाठी हिमायतनगर तालुक्यातील शेतकर्यांनी येथील तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.

गत १५ दिवसापासून पाऊस पडत नसल्याने लागवड केलेली कपाशीची पिके नुकसानीत आली आहेत. तळपत्या उन्हामुळे कोवळी पिके तग धरत, मान खाली टाकून देत असल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची पाळी येणार आहे. गत वर्षी झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती. या वर्षी मृग नक्षत्र कोरडे गेले, आर्द्रताही तेच हाल होत आहेत. त्यामुळे कोरडा दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली असून, यामुळे नुकसानीत आलेल्या पिकांचे पंचनामे करून भरपाई मिळून द्यावी या मागणीचे निवेदन येथील शेतकर्यांनी प्रभारी तहसीलदार श्री गायकवाड यांना दिले आहे. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष गजानन तुप्तेवार, बाळू चावरे, साहेबराव चव्हाण, सुरज दासेवार, केवलदास सेवनकर, जमील भाई, अमिर अहेमद, शे.मोइन, दलीप ढोणे, विठ्ठल ढोणे, चंदुलाल बाबूलाल, शिवशंकर कोंडरवाड, सचिन कल्याणकर, राजारामसिंह ठाकूर, नसीर अहेमद, मुश्ताक अहेमद, अमोल बंडेवार, पंजाबराव पाटील, खंडेराव मिराशे, प्रकाश हनवते, बालाजी घुंगरे, विठ्ठलराव वानखेडे, पंजाब राउत, गोविंद गोखले, राजाराम गुंडेवार, गणेश भोयर, संजय गुड्डेटवार, माधव बिंगेवार, बाळू मुधोळकर, दत्तात्रेय तीम्मापुरे, गंगाधार्कात्रे, कमलबाई तीम्मापुरे आदींसह शेकाडो शेतकयांच्या स्वाक्षर्या आहेत.

दुष्काळाचे भीषण चटके सहन करणारर्या हिमायतनगर तालुक्यात ३३ हजार २०० हेक्टर जमीन पेरणीयोग्य सर्वसाधारण आहे. त्यापैकी सन २०१२-१३ च्या हंगामात ३४ हजार ९७० हेक्टर जमिनीवर खरीपाची पेरणी करण्यात आली होती. यात सर्वाधिक पेरा कापसाचा झाला असून, २० हजार ६०० हेक्टर मधील शेतकर्यांनी पांढरे सोने उगविले होते. तर ६ हजार ९६३ हेक्टर मध्ये सोयाबीनची लागवड झाली होती. तर तूर २४३२ हेक्टर, मुग ३९० हेक्टर, उडीत ४०४ हेक्टर, तीळ ५९ हेक्टर, ज्वारी ३ हजार ३१७ हेक्टर, भात २५ हेक्टर,उस ७९० हेक्टर वर लागवड झाली होती. अशी माहिती कृषी अधिकारी दवालाबाजे यांनी दिली. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी