लाचखोर तलाठ्याचा प्रताप

हिमायतनगर(अनिल मादसवार)पैनगंगा तीरावर विदर्भ भागातीलपळसपूर घाटावरून वाळू तस्करी करणाऱ्या दोन वाहनांना हिमायतनगर सज्जाच्या तलाठ्याने पकडून आर्थिक तडजोडीने सोडून दिल्यामुळे महसूल विभागाच्या तिजोरीला फटका बसला आहे. या प्रकाराकडे जिल्हाधीकायानी लक्ष देऊन लाचखोर तलाठ्यावर निलंबनाची कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरत आहे.

विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीकाठावर कामारी, दिघी, घारापुर, रेणापूर, पळसपूर, धानोरा, वारंग टाकळी, सरसम मासोबा नाला, यासह अन्य रेती घाट आहेत. मागील वर्षात यातील केवळ घारापुर, येथील रेती पेंडचा लिलाव प्रशासनाने केला असून, अन्य ठिकाणचे लिलाव अजूनही होणे बाकी आहे. परंतु प्रशासनाचे नियम डावलून लिलाव न झालेल्या रेती घाटावरून येथील तलाठी सुगावे यांच्या आशीर्वादाने पळसपूर पेंडावरून विदर्भ व मराठवाड्यातील वाळू तस्करांनि चार ते पाच ट्रेक्टर द्वारे मोठ्या प्रमाणात रात्र- दिवस रेतीच्या उपसा सुरु केला आहे. परिणामी पैनगंगा नदी परिसरातील पर्यावरण धोक्यात आले असून, यामुळे प्रशासनाचा लाखोचा महसूल बुडविल्या जात आहे.

दि.०६ रोजी याच पळसपूर रेती पेंडावरून विदर्भातील व मराठवाड्यातील वाळू दादांनी उच्छाद मांडून वाळूची चोरी चालविली आहे. यावरून येथील तलाठी सुगावे यांनी विदर्भातील परझना व ब्राम्हणगाव येथील दोन रेतीचे वाहने पकडून त्यांचे छायाचित्र काढून कार्यवाही करण्याची भीती दाखविली. मात्र प्रत्यक्षात कोणतीच कायावाही न करता संबंधित वाहनचालका कडून चार एकादी रक्कम घेऊन सोडून दिले आहे. अशी माहिती पळसपूर येथील एका व्यक्तीने नाव न छापण्याच्या अटीवर दिली असून, याबाबत सुगावे यांच्याशी विचारणा केली असता, त्यांनी मी वाळू पेंदावर गेलो होत या वृत्तास दुजोरा देत , वाहनधारक पसार झाल्याचे सांगून फोन बंद केला आहे.

तर मंडळ अधिकारी सय्यद यांना संपर्क केला असता ते नोट रिचेबल होते. तसेच नूतन तहसीलदार आनंद जराड यांच्याशी विचारणा केली असता, मला आवाज येत नाहीये...असे कारण समोर केले, पुन्हा प्रयत्न केला असता फोन बंद केला होता. येवून वाळू चोरटे व महसूल विभागातील अधिकारी यांचे लागेबांधे असल्याचे स्पष्ट होत असून, अश्या पद्धतीने शासनाच्या मालमत्तेवर डल्ला मारू पाहणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून रेती तस्करीस आळा घालावा अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरिकांनी केली आहे.

मागील मे महिन्यात रेती चोरांनी उच्छाद मांडल्याचे समजताच अर्थपूर्ण दुर्लक्षाने पळसपूर पेंडावरून रेती तस्करी जोरात.. या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. तसेच संदर्भात तहसीलदार अरुण जराड यांच्याशी संपर्क साधला होता, त्या प्रसंगी त्यांनी अर्थपूर्ण संबंधाविषयी मला कसलीही माहिती नाही. यापूर्वी आलेल्या तक्रारीवरून मंडळ अधिकार्यांना सूचना दिल्या होत्या. तरी सुद्धा रेती तस्करी सुरु असल्याने निवडणुकीचा कामकाज संपताच मी स्वतः रेती घाटावर जाऊन रेती तस्करावर कार्यवाही करेन. जो कोणी अधिकारी रेती तस्करांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर सुद्धा कार्यवाही करण्याचे आश्वासन दिलेहोते. परंतु त्यानंतर तहसीलदार यांनी अद्याप्साम्बंधीतावर कोणतीच कायावाही केली नसल्याने, तलाठी व रेती तस्करांना अभय मिळाले असून, पुन्हा राजरोसपणे रेती चोरीला सुरुवात केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी