पालकांनी मुख्याध्यापकास घेरले

हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील सिबदरा येथील शिक्षकांनी मनमानी कारभार सुरु केला असून, शाळेची वेळ १० वाजता असताना सकाळी ९.३० वाजता शाळा उघडायला हवी होती. मात्र सकाळी ११ वाजले तरी शाळेला कुलूप दिसून आल्याने शिक्षण प्रेमी पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला, तसेच रजा न देता उशिरा शाळेत येणे व काही शिक्षक गैरहजर राहिल्याने उपस्थित नागरिकांनी मुख्याध्यापकास घेराव घालून धारेवर धरल्याने चांगलाच गोंधळ उडाला होता.

शैक्षणिक वर्ष २०१४ ची सुरुवात होऊन दहा दिवसाचा कालावधी लोटला नसताना हिमायतनगर तालुक्यातील शिक्षकांनी मनमानी कारभार सुरु केला आहे. याचे जिवंत उदाहरण आज दि. २५ रोजी तालुक्यातील मौजे सिबदरा येथील शाळेवर दिसून आल्याने संतप्त शिक्षण प्रेमी पालकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मंगरूळ केंद्र अंतर्गत येणारी जी.प.उच्च प्राथमिक शाळा सिबदरा ता. हिमायतनगर येथे पहिली ते सातवी पर्यंत वर्ग भरविले जातात. यात एकूण १४० विद्यार्थी संख्या असून, या ठिकाणी शिक्षकांची संख्या ७ असून, कार्यरत ५ तर २ शिक्षकाच्या रिक्त जागा आहेत. जिल्ह्यात शाळांची सुरुवात झाली असून, येथील शाळेत कार्यरत असलेल्या मुख्याध्यापकासह पाच शिक्षकांनी दोन दिवसा शाळा सुरळीत चालून पुन्हा मनमानी कारभार सुरु केला आहे. शाळा वेळेवर न उघडणे, शाळेत वेळेवर हजर न होणे, शाळा सुरु झाली तरी कोणतीही रजा न देता काही हजर तर काही जन गैरहजर राहणे असा प्रकार सांगणमताने सुरु केला आहे. त्यामुळे येथील विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, शिक्षणाचा पाया खचण्याची भीती पालक वर्गातून व्यक्त होत आहे. या बाबीला कंटाळून चक्क काही पालकांनी आपल्या पल्ल्याना हिमायतनगर येथील खाजगी शिक्षण संस्थेत प्रवेश दिल्याचे उपस्थीत पालकांनी प्रस्तुत प्रतिनिधीस बोलताना सांगितले. या प्रकाराकडे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष बेटमोगरेकर, जिल्हा शिक्षण सभापती कराळे यांनी, शिक्षण अधिकारी श्री पाटील यांनी लक्ष देऊन शाळेतील भोंगळ कारभारावर अंकुश लाऊन शिक्षणिक दर्जा सुधारावा अशी मागणी केली. यावेळी केरबा सुद्देवाड, गुरुदास गोसलवाड, संजय बाचकलवाड, शंकर भदेवाड, राम उक्कलवाड, संतोष नालनवार, गजानन गोसलवाड यांच्यासह बहुसंख्या पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

शाळा सुरु होण्याची वेळ निघून गेल्यानंतर शाळेचे एक शिक्षक चौधरी हे १०.३० वाजता शाळेवर हजार होऊन ११ वाजता शाळेचे कुलूप उघडले. तर खुद्द मुख्याध्यापक जाधव जी.के. आणि जाधव पी.एल. हे शिक्षक ११.३० वाजता शाळेवर हजार झाले. त्यानंतर शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना आत घेण्यात आले, उशिरा आलेल्या मुख्याध्यापक व सर्व शिक्षकास येथील शिक्षण प्रेमी पालकांनी धारेवर धरले होते. शाळेचे काम सोडून घरगुती कामावर का लक्ष देता असा प्रश विचारला, मात्र संबंधित शिक्षकांनी पालकांना उडवा - उडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे काहींनी या बाबतची माहिती प्रभारी गटविकास अधिकारी संगपवाड यांना व पत्रकारांना दिली. पत्रकार शाळेवर पोहोंचले तरी सुद्धा गटशिक्षण अधिकारी आले नव्हते, विचारणा केली असता त्यांनी सदर शाळेवर पंचनाम्यासाठी मंगरूळच्या प्रभारी केंद्र प्रमुख श्री भिसे यांना पाठविल्याचे सांगितले आहे. वृत्त लिहीपर्यंत उशिरालेल्या शिक्षक, मुख्याध्यापकावर काय कार्यवाही केली हे समजू शकले नाही.

याबाबत गटशिक्षण अधिकारी संगपवाड यांना विचारले असता ते म्हणाले कि, चौकशीसाठी भिसे यांना पाठविले आहे, शाळेवर उशिरा येणारे शिक्षक दोषी आढळल्यास एक दिवसाची पगार कपात करण्यात युन पुढील कार्यवाहीसाठी वैष्ठांकडे प्रस्तावित करण्यात येईल असे ते म्हणाले.

याबबत मुख्याध्यापक जाधव यांना विचारले असता, मी बैन्केत कामासाठी गेलो होतो अन्य एका शिक्षकावर शाळा उघडण्याची जबाबदारी टाकली होती. एकाची जिल्हा बदली, एक बिमार, एक प्रशिक्षण, एक रजेवर आहेत असे ते म्हणाले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी