लाभार्थ्यांना ४ कोटीचे वितरण

गारपीट व अतिवृष्टीच्या ४६ गावातील १७ हजार २४३ लाभार्थ्यांना ४ कोटीचे वितरण.. शाखाधिकारी 

हिमायतनगर(अनिल मादसवार)गतवर्षी अतिवृष्टी व चालू वर्षी गारपिटीने शेतकर्यांना हैराण करून सोडले होते, यात तडाखा बसलेल्या गावांना राज्य शासनाकडून उपलब्ध झालेले नुकसान भरपाई बाबतचे सानुग्रह अनुदान शहरातील नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी शाखेतून वितरण करण्याचे काम शांततेत सुरु असून, आजवर ४६ गावातील १७ हजार २४३ लाभार्थ्यांना ४ कोटीचे वितरण..झाल्याची माहिती शाखाधिकारी पांडू पाटील यांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना दिली.

हिमायतनगर तालुक्यातील ६८ गावांना सन २०१३ च्या खरीप हंगामात जुलै - ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीचा तडाखा बसून शेतातील पिके हाताची गेल्याने बळीराजा संकटात सापडला होता. या नुकसानीची पाहणी मदत व पुनर्वसन राज्यमंत्री सुरेश धस यांनी करून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्याच अनुषंगाने नुकसानग्रस्त शेतकर्यांना ५ कोटी ६८ लाख ३३ हजार  रुपयाचे सानुग्रह अनुदान उपलब्ध झाले असून, यातील ४६ गावातील १७ हजार २४३ लाभार्थ्यांना जवळपास ४ कोटीचे वितरण करण्यात आले. तसेच उर्वरित १२ गावातील ५ हजार २१७ लाभार्थ्यांना ०१ कोटी सत्तर लाख रुपयाचा उर्वरित निधी वितरण करण्याचे काम सुरु असून हे काम जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

तालुक्यातील ५५ गावातील गोर - गरिबांच्या पडझड झालेल्या घरांसाठी २५ लाख रुपये प्राप्त झाले असल्याची माहिती शाखाधिकारी यांनी दिली. घरपडी आणि या वर्षी रब्बी हंगामात झालेल्या गरपिटीच्या नुकसानी बाबत हिमायतनगर तालुक्यातील धानोरा, सिरपल्ली, वारंग टाकळी, मंगरूळ, बोरगडी- तांडा या गावातील शेतकर्यांना २५ लाख ६८ हजाराच्या निधी वितरण लवकरच करण्यात येणार आहे. या कामी तालुक्यातील लाभार्थी शेतकर्यांनी आजवर मोलाचे सहकार्य केले असून, आगामी काळातील कामातही सर्वांनी शांततेचे सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी जी.एन.वासाटे, एस.डी.अक्कलवाड, टी.के.मालूचे, आर.एम.जाधव, एम.ए.शेख, मारोती वानखेडे आदी कर्मचारी, नागरिक लाभार्थी व पत्रकार उपस्थित होते.      

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी