बंधार्याचे काम निकृष्ठ

सव्वा कोटीच्या लघुसिंचन बंधार्याचे काम निकृष्ठ 


हिमायतनगर(प्रतिनिधी)तालुक्यातील खडकी बा. नाल्यावर करण्यात येत असलेल्या सव्वा कोटीच्या केटी- वेअर लघुसिंचन (जलसंधारण) बंधार्याचे काम अत्यंत निकृष्ठ पद्धतीने केले जात असून, सदर बंधारा पहिल्याच पावसात वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  

तालुक्यातील खडकी बा.येथील नाल्यावर लघुसिंचन(जलसंधारण)विभाग, कार्यकारी अभियंता नांदेड यांच्या देखरेखीखाली सव्वा दोन कोटीच्या निधीतून बंधारा व भव्य अश्या पुलाचे बांधकाम केले जात आहे. सदरचे बांधकाम नांदेड येथील राजकीय वरदहस्त प्राप्त एका गुत्तेदाराकडून मुनिमाच्या देखरेखीखाली सुरु आहे. या कामाची सुरुवात मागील आठ महिन्यापूर्वी करण्यात आली असून, कामाच्या पाया भरनीत गुत्तेदाराने मोठ मोठे टोळके दगड्भरून मातीमिश्रीत रेतीच्या वापरून सुरु केले आहे. हि बाब तत्कालीन अभियंता यांच्या लक्षात येताच त्यांनी सदर गुत्तेदारास जाब विचारला होता, मात्र राजकीय वरदहस्त असलेल्या गुत्तेदाराने त्यांची काहीच न ऐकता निकृष्ठ कामाचा सपाटा सुरूच ठेवला आहे. 

सदर कामासाठी याचा नाल्यातील मातीत मिस्त्रीत वाळू जमा करून भव्य ढिगार उभारण्यात आले असून, या कामातील खांब उभारणीत १२ एम.एम.गजाळी, माती मिश्रीत रेती, सिमेंट कमी प्रमाणात वापरून शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न चालविला आहे. एवढेचे नव्हे तर सदर काम सुरु असताना कुरिंग साठी पाण्याचा कमी प्रमाणात वापर होत असल्याने बंधार्याची मजबुती टिकाऊ न होता, पहिल्याचा पावसात वाहून जाण्याची शक्यता निमण झाली आहे. खरे पाहता सदरचे काम अंदाजपत्रकानुसार दर्जा राखून काम पारदर्शकतेने करणे गरजेचे होते. तसेच काम सुरु होण्याअगोदर या ठिकाणे कामाचे फलक, ज्यात योजनेचे नाव, कामाचा अवधी, मंजूर निधी, अभियंता गुत्तेदाराचे नाव लिहिणे गरजेचे आहे. मात्र असे कोणतेही फलक न लावता कोट्यावधीचे काम हे लाखो रुपयात करून विद्यमान अभियंत्याच्या मिलीभागताने गुत्तेदार मालामाल होऊ पाहत आहेत. असा आरोप परिसरातील नागरिकांतून केला जात आहे. या निकृष्ठ कामाची उच्च स्तरीय चौकशी करून शासनाच्या जलसंधारणाचा उद्देश सफल करावा तसेच निकृष्ठ पद्धतीने काम करून जनतेसह शासनाच्या डोळ्यात धूळफेक करू पाहणाऱ्या गुत्तेदारावर दंडात्मक कार्यवाही कारवाई करून काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणीही जोर धरत आहे.   

या संदर्भात अभियंता पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला ते दवाखान्यात गेले असल्याचे गुत्तेदाराने सांगितले त्यामुळे त्यांचा संपक होऊ शकला नाही.    

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी