चोरीचे सत्र सुरु

तालुक्यात डी.पी.तील तांब्याची तार चोरीचे सत्र सुरु 


पळसपूर(चांदराव वानखेडे)येथील शेतकऱ्याच्या शेत शिवारातील डी.पी.ची तोडफोड अज्ञात चोरट्यांनी करून तांब्याची तार व ओइल लंपास केल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. याबाबत लाईनमन श्री मेरगेवाड यांनी पंचनामा केला असून, पोलिस स्थानकात तक्रार दिली आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात डी.पी.तील साहित्य चोरीच्या घटना घडत असताना महावितरण कंपनीच्या वरिष्ठांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून केला जात आहे.

मागील अनेक वर्षापासून तालुक्यातील ३३ के.व्ही.केंद्र अंतर्गत येणाऱ्या टेंभी, सरसम, सवना ज., खडकी बा., हिमायतनगर दिवसपासून पळसपूर - डोल्हारी - सिरपल्ली परिसरात अज्ञात चोरट्यांनी  धुमाकूळ घातला असून, शेतकऱ्यांच्या शेतीला पुरवठा केला जाणार्या डी.पी.ची तोडफोड करून त्यातील महागडे ओईल, साहित्य आणि तांब्याची तार चोरी केली जात आहे. अशीच घटना दि.१६ सोमवारच्या रात्री अज्ञात पळसपूर शिवारात घडली असून, सुभाष वानखेडे आणि चांदराव गणपती यांच्या शेत शिवारात बसविण्यात आलेल्या २५ के.व्ही. डी.पी. चा विद्दुत पुरवठा बंद करून त्यातील तांब्याची तार चोरून  नेली आहे. या घटनास्थळावर डी.पी. ची पेटी, कीट - कैटचा डब्बा जैसे थेच फेकून देऊन छोट्यांनी लाखो रुपये किमतीची तांब्याची तार लंपास केली आहे.  या घटनेमुळे परीसरातील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित झाला असून, अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. काही शेतकर्यांनी पाण्यावर कापसाची धूळ पेरणी केली असून, विद्दुत पुरवठा खंडित झाल्याने  त्या शेतकऱ्यांच्या कपाशीचे नुकसान होण्याची शक्यता बळावली आहे.         

मागील वर्षभरात हिमायतनगर तालुका उपविभागातून शेकडो डी.पी.ची तोडफोड करून कॉपर व ओईल चोरी झाल्याच्या घटना घडल्या असून, यात महावितरण कंपनीचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी