हिमायतनगर गहिवरले

लोकनेत्याच्या दुखाने हिमायतनगर गहिवरले


हिमायतनगर(अनिल मादसवार)आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे..विलासराव देशमुख.. प्रमोद महाजन..आणि आता गोपीनाथ मुंडे अरे किती धक्के सहन करायचे या महाराष्ट्राने एक लोकनेता तयार व्हायला दशके लागतात. आणि एका क्षणातच मुंडे सारख्या सूर्याचा अस्त झाला..अश्या महान नेत्यांना मनाचा मुजरा व भावपूर्ण श्रद्धांजली... 

१) महाराष्ट्राचा खंबीर नेता असलेले गोपीनाथराव मुंडे यांचे अपघाती निधन झाल्यावर विश्वास बसत नाही. अश्या प्रकारे एकाद्या मोठ्या मंत्र्याचे अपघातात निधन होणे म्हणजे हि एक शोकांतिका आहे. खरे पाहता एवढ्या मोठ्या मंत्र्याला साधी सुरक्षा सुद्धा नव्हती त्यामुळे हा घात- पात असू शकतो. म्हणून या घटनेची सखोल चौकशी व्हायला हवी. अशी प्रतिक्रिया व्यक्त करून स्टीलचे व्यापारी राजेश्वर रायेवार यांनी गोपीनाथ मुंडेना श्रद्धांजली वाहिली. 

२) केंद्रीय ग्रामविकास मंत्री श्री. गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन हे अतिशय धक्कादायक वृत्त आहे. त्यांच्या जाण्याने अवघ्या महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले असून, सर्वत्र स्मशान शांतता पसरली आहे. त्यांनी कधी स्वार्थासाठी राजकारण केले नसून, नेहमीचे जनतेच्या प्रश्नासाठी झटत होते. त्यांच्यामुळे महाराष्ट्रात भाजपला उभारी आली असून, आता विकासाकडे वाटचाल होऊन अच्छे दिन येण्याची वात जनता पाहत होती. मात्र त्यांच्या अपघाती निधनाने सर्वाना घायाळ केले असून, असा धडाडीचा नेता पुन्हा होणे नाही, या शब्दात भाजपचे राज्य सदस्य प्रकाश अण्णा तुप्तेवार यांनी व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली. 

३) गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्रातील भाजप - शिवसेनेसाठी आधारवड होते. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे भाजप - शिवसेनेवर मोठे संकट आले असून, आधारवड गेल्याने अस्वस्थता पसरली आहे. बाळासाहेब ठाकरे नंतर भाजपचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे आम्हाला सोडून गेल्याने आता आम्ही कोणाच्या नेतृत्वाने समोर जावे अश्या शब्दात दुख व्यक्त करीत परमेश्वर मंदिर संस्थांचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी श्रद्धांजली वाहिली. 

४) विलासरावानंतर महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांच्या रूपाने खंबीर नेतृत्व मिळाले होते. मात्र आत्ता कुठे महाराष्ट्राला केंदीय ग्रामविकास मंत्र्याच्या माध्यमातून संधी मिळाली होती. त्यांच्या निवडीनंतर महाराष्ट्राचा चेहरा - मोहर बदलणार असे वाटत असताना अल्पावधीतच या अपघातात त्यांचे निधन झाले. महाराष्ट्राचे हे सर्वात मोठे नुकसान असून, यामुळे महाराष्ट्राबरोबर नांदेड जिल्हा पोरका झाला आहे. अश्या शब्दात हिमायतनगर येथील सरपंच श्रीमती गंगाबाई शिंदे यांनी मुंडेच्या निधनाबद्दल दुख व्यक्त केले. 

५) गोपीनाथ मुंडेच्या यांच्या नेतृत्वाने तळागाळातील व ग्रामीण भागातील जान असलेला ओबीसी अल्प संख्यांक समाजातील नागरिकांचा ते आधारवड होते. दिल्लीच्या तख्तावर गेल्यानंतर प्रमोद महाजन, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे सारखे एकापाठोपाठ तीन महान नेत्यांना आपण मुकलो आहोत. त्यांच्या जाण्याने महराष्ट्राबरोबर मराठवाड्याचे प्रचंड नुकसान झाले अश्या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे जी.प.माजी बांधकाम सभापती प्रताप देशमुख सरसमकर यांनी श्रद्धांजली वाहिली. 

६) गोरगरीबांचा नेता, दिन दलितांचा कैवारी, सर्व समान्य तळागाळातील जनतेची जन असणार्या नेत्याला आपण मुकलो आहोत. त्यामुळे शिवसेना - भाजप बरोबर महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले असून, त्यांच्या जाण्याने विकासाभिमुक व्यक्तीची छत्रछायेपासून आपण पोरके झाल्याचे शब्द व्यक्त करीत कांतागुरु वाळके यांनी मुंडेना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी