नेत्यांचा घाट यशस्वी

तहसीलदार चौरे पुन्हा हिंगोलीला रुजू ... 
राजकीय नेत्यांचा घाट यशस्वी  


हिमायतनगर(अनिल मादसवार)तहसीलदार पदी आबासाहेब चौरे शनिवारी १२ वाजता हिमायतनगर तहसील मध्ये रुजू होताच..अवघ्या तीन तासाने आर.डी.सीच्या आदेशाने परतले असून, पुन्हा त्यांना देण्यात आलेल्या तोंडी आदेश वजा सूचनेने हिंगोलीला पूर्व पदावर रुजू व्हावे लागले आहे. या सर्व प्रकारात हिमायतनगर येथील काही बड्या राजकीय नेत्यांचा हात असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.त्यामुळे हिमायतनगर तालुक्याच्या मागासलेपणात वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व राजकीय नेतेच जबाबदार असल्याचा प्रत्यय चौरे यांच्या बदलीवरून दिसून येत आहे.

हिमायतनगर तालुका निर्मित्त होऊन अनेक वर्ष लोटली तरी तालुक्याचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. मागास तालुका म्हणून शिक्षणासह सवाचा क्षेत्रात हिमायतनगर तालुक्याची गणना केली जात असते. याच कारनाने या तालुक्यात येण्यासाठी कोणताही कर्मचारी अथवा अधिकारी धजावत नाही. परंतु येथे काम करण्याच्या प्रबळ इच्छेने येणाऱ्या अधिकार्यास राजकारणी खोड घालून पिटाळून लावत असतात. याचेच एक जिवंत उदाहरण म्हणजे काल दि.१४ शनिवारी रोजी तहसीलदार पदाचा कार्यभार स्वीकारलेले आबासाहेब चौरे यांना अवघ्या तीन तासातच येथून हटवण्यात राजकीय नेत्यांनी बाजी मारली आहे. त्यामुळे आर.डी.की.च्या आदेशाने पुन्हा हिंगोली येथे पाठविण्यात राजकीय वरदहस्त लाभलेल्या गुत्तेदार तथा गौण खनिज तस्करांनी यश मिळविले आहे. 

yache खरे कारण हिमायतनगर येथे आबासाहेब नायब तहसीलदार असताना गौण खनिज तस्करांना सळो कि पळो करून सोडले होते. तसेच अनेकांवर दंडात्मक कार्यवाही करून वेळ प्रसंगी पोलीसातही गुन्हे दाखल केले होते. याच संतापावरून आबासाहेब चौरे हाताव अभियान या तस्कर माफियांनी राबून यशस्वी केले आहे. यावरून वरिष्ठ स्तरावरील राजकीय अधिकारी राजकारण्यांच्या दबावाला बळी पडले असल्यानेच श्री चौरे यांना परत पाठवण्यात आल्याचे जनतेतून बोलल्या जात आहे. 

वरिष्ट पातळीवर निर्णायक भूमिका घेणारे तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांची पुन्हा एकदा या निमित्ताने आठवण झाली.कोणत्याही राजकीय नेत्यांची ढवळा -ढवळन सहन कार्नाराखाम्बीर अधिकारी म्हणून त्यांनी मिळविलेली ओळख कायम असतानाचं विद्यमान जिल्हाधिकारी धीरज कुमार कुठे तरी राजकारण्यांच्या दबावाला बळी पडत असल्याचे चर्चिले जात आहे. कर्तव्यदक्ष आणि हिमायतनगर तालुक्याच्या समस्यांची जाणीव असलेल्या आबासाहेब चौरे यांना तहसीलदार पदी पूर्ववत पाठविण्यास्ठी प्रतिष्ठित नागरिकांचे एक शिष्टमंडळ लवकरच जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन श्री चौरे यांना  कायम हिमायतनगर येथे तहसीलदार पदी रुजू करण्याची विनंती करणार आहे. तसे न झाल्यास एका चांगल्या अधिकार्यासाठी जन आंदोलन उभारणार असल्याचे समजते. याबाबत आर डी.सी.नांदेड कार्यालयाशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता झाला नसल्याने अधिकचि माहिती मिळू शकला नाही.

सर्वच शासकीय कर्मचार्यांचे अधिकारी प्रभारी कारभारी

येथील जवळपास सर्वच कार्यालयाचे अधिकारी हे सध्या तरी प्रभारी असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रभारी असलेले अधिकारी अनेक दिवस तालुक्याकडे फिरकत  नसल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. भोकरचे गटविकास अधिकारी श्री गोरे यांच्याकडे हिमायतनगरच्या  गटविकास अधिकार्याचा प्रभारी कारभार आहे. शिक्षण विस्तार अधिकारी श्री संगपवाड यांच्याकडे गटशिक्षण अधिकारी पदाचा कारभार आहे. तहसीलदार प्रभारी गायकवाड असून, पोलिस निरीक्षक सुरेंद्र सोनवणे बदलीच्या प्रयत्नात असल्याने येथे कायमस्वरूपी अधिकारी मिळणे अथवा टिकून राहणे कठीण झाले आहे. यावरून हिमायतनगर तालुक्याचा मागासलेपनात वरिष्ठ अधिकारी व राजकारणी नेतेच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.      

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी