पर्जन्यवृष्टीसाठी

हिमायतनगर(अनिल मादसवार)हे वरून राजा...शेतकऱ्यांची किरी परीक्षा घेणार... आम्हावरील दुष्काळ सदृश्य परिस्थिती हटविण्यासाठी पावसाच्या आगमनाने संपूर्ण चराचर सृष्टी न्हाऊन काढून सुगीचे दिवस येऊ दे.. आतातरी आमच्या हाकेला धाऊन ये... अशी प्रार्थना करीत हिमायतनगर येथील शेतकरी कष्टकरी, मजूरदार व सामान्य नागरिकांची पैनगंगा ते हिमायतनगर परमेश्वर मंदिर अशी पाई दिंडी टाळ मृदंगाच्या गजरात शुक्रवारी काढण्यात आली होती. दिंडी परत शहरात आल्यानंतर सर्व देवी देवतांना जलाभिषेक करून साकडे घालण्यात आले.

या वर्षी जून महिना संपत आला तरी आवश्यक त्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली नाही, जी झाली त्या भरवश्यावर शेतकर्यांनी पेरलेली पिके उन्हामुळे करपू लागली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, यामुळे शेतकर्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. यासाठी लागणारी बी - बियाणे, खते कुठून आणणार असा यक्ष पश्न बळीराजाला पडला आहे. या परिस्थितीतून केवळ वरून राजाचं वाचऊ शकतो त्यामुळे येथील नागरिक वरून राजाला प्रसन्न करण्यासाठी दि.२७ रोजी सकाळी विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा नदी पर्यंत पाई दिंडी काढली होती. या दिंडीचे नेतृत्व कांतागुरु वाळके यांनी केले. तर दिंडीत नारायण महाराज, रामराव ढोणे, नारायण जाधव, यांच्यासह परमेश्वर भजनी मंडळातील महिला - पुरुष मोठ्या संखेने सामील झाले होते. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी