ए.टी.एम.मशीनमधून

भारतीय स्टेट बैंक अधिकार्याचा भोंगळ कारभार
ए.टी.एम.मशीनमधून ग्राहकांना येतेय कमी रक्कम

 
हिमायतनगर(अनिल मादसवार) शहरातील भातीय स्टेट बैन्केच्या शाखाधिकार्यांनी हलगर्जी पनाची सीमाच  पार केली असून, बैन्केचा कारभार कर्मचार्यांच्या भरवश्यावर सोडल्या जात असल्याने चक्क ग्राहकांना ए.टी.एम.माशिमधून मागणीपेक्षा कमी रक्कम येत असल्याचे उघड झाले आहे.

मागील वर्षापासून भारतीय स्टेट बैन्केतील अधिकायानी मनमानी कारभाराचा कळस गाठला आहे. बैन्केत येणाऱ्या ग्राहकांशी उद्धट पनाची वागणूक, वेळेवर कामकाज सुरु न करणे, बैन्केत येउन सुद्धा ग्राहकांची गर्दी असताना जाणीवपूर्वक वेळ मारून नेण्यासाठी बाहेर पानटपरी, लघुशंका यासह अन्य कामात वेळ वाया घालून ग्राहकांना ताटकळत उभे ठेवणे, पिक कर्जासाठी अडवणूक, महामंडळाचे कर्ज वितरण यासह खाते काढण्यास टाळाटाळ करून कामचुकार पना करीत आहेत. त्यामुळेच कि काय ए.टी.एम.मशीनमध्ये टाकण्यात आलेल्या पाचशे रुपयाच्या नोटांमध्ये शंभराची नोट निघाल्यामुळे एका ग्राहकाला चारशे रुपयाचा फटका बसला आहे.

दि.२३ सोमवारी येथील हुजपा शाळेत कार्यरत असलेले शिक्षक श्री करणसिंह भगवानसिंह ठाकूर हे  आपली पगार जमा झाल्यामुळे हिमायतनगर येथील भातीय स्टेट बैंक शाखेतील ए.टी.एम. मशीनमध्ये रक्कम काढण्यासाठी सकाळी १०.२२ वाजता गेले होते. नेहमीप्रमाणे त्यांनी प्रथम ए.टी.एम. कार्डाचा वापर करून सुरुवातीला २० हजार रुपये काढले त्यावेळी ५०० रुपयाच्या ४० नोटा बरोबर आल्या. त्यानंतर दुसर्यांदा १० हजाराच्या मागणी केली असता ५०० रुपयाच्या २० नोटा निघणे गरजेचे होते. मात्र केवळ १९ नोटा ५०० रुपयाचे व ०१ नोट शंभराची नोट आल्याने खातेदार अचंबित झाले. त्यांनी सदरच्या नोटा प्रत्यक्ष या ठिकाणी असलेले गार्ड यांच्या समक्ष मोजल्या. या बाबतची माहिती शाखाधिकारी श्री जैन यांना देण्यासाठी गेले असता प्रथम त्यांनी असा प्रकार होणे नाही असे सांगून ग्राहकास धूडकाऊन लावण्याचा प्रयत्न केला होता. नंतर त्यांनी ग्राहकाचा अर्ज घेतला खरा, परंतु नुकसान भरपाईचे मात्र ठोक आश्वासन न दिल्याने ४०० रुपयाचा भुर्दंड सदर ग्राहकास सोसावा लागल आहे. 

मागील काळात सदरील बैंक मैनेजर जैन यांच्याविषयी ग्राहकांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून, अनेक नागरिकांनी जैन यांची हकल पट्टी करण्यासाठी वरिष्ठांकडे मागणी करूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने बैंक ग्राहकात संतापाची लाट पसरली आहे. शासनाच्या अनेक योजनांचा निधी सदरील बैंक अधिकार्याने ग्राहकांना न देण्याची शपतच घेतली काय..? असे या अधिकार्याच्या कर्तुत्वातून दिसून येत आहे.    

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी