गणवेश व पुस्तकापासून अनेक विद्यार्थी वंचित

शाळेच्या पहिल्याच दिवशी
गणवेश व पुस्तकापासून अनेक विद्यार्थी वंचित


हिमायतनगर(अनिल मादसवार)शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी समारंभपुर्वक मोफ़त पाठ्यपुस्तके आणि जि.प.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील मुली तसेच अनुसूचित जाती व जमातीच्या मुलांना मोफ़त गणवेश वितरित करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र हिमायतनगर तालुक्यातील मोफत पाठ्य पुस्तके व गणवेशाचे वितरण झाले नसल्याने शिक्षणप्रेमी पालकातून नाराजी व्यक्त होत असून, शिक्षण विभागाचा गलथान कारभार पहिल्याचा दिसून आला आहे. 

हिमायतनगर तालुका क्षेत्रातील सर्व शाळांना सोमवार पासून सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषद, शासन अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत गणवेश व पुस्तकांचे वितरण करण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले होते. मात्र याची अंमलबजावणी हिमायतनगर तालुक्यातील बहुतांश शाळांवर झाली नसल्याची बाब शाळेच्या पहिल्या दिवशी उघड झाली आहे. तालुक्यात प्राथमिक १०४ शाळा तर माध्यमिक १२ असे एकूण ११६ शाळांची संख्या असून, यामध्ये हजारो विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. बर्याच शाळात शिक्षकांची पदे रिक्त असून, यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळेच कि काय..? बहुतांश शाळामध्ये आज पहिल्या दिवशी पालक व विद्यार्थी उदासीन दिसून आले होते. त्यातच तालुक्यातील काही शाळांमध्ये अपूर्ण पुस्तकांचा पुरवठा कण्यात आला तर काहीना पुस्तके मिळाली असली तरी पहिल्या दिवशी पुस्तक वाटपाचे गणित बिघडल्याचे अनेक शाळांमध्ये उपस्थित झालेल्या शिक्षण प्रेमी पालकांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना  सांगितले.

याबाबत पं.स.विषयतज्ञ श्री पतंगे एन.डी.यांच्याशी विचारणा केली असता ते म्हणाले कि, आमच्याकडून सव शाळांना १५ दिवसापूर्वीच पुस्तकाचे वितरण करण्यात आले. गणवेषाबाबत ते म्हनाले की, आम्ही विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या मागणीचा आकडा मागितला असल्याचे सांगितले. येवून पंचायत समिती गटशिक्षण विभागातील जबाबदार अधिकारी गणवेश बाबत उदासीनता का..? दाखवीत आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रभारी गटशिक्षण अधिकारी संगपवाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, सर्वच शाळांवर पुस्तके वाटप करण्यात आली. गणवेषाबाबत विद्यमान गटशिक्षण अधिकारी रजेवर असल्याने आर्थिक व्यवहार थांबले आहेत. लवकरच व्यवहार सुरळीत होऊन शैक्षणिक पटनोंदणी पंधरवाड्या दरम्यान ३० तारखेपर्यंत सर्व शाळातील विद्यार्थ्यांना गणवेश मिळतील असे सांगितले.     

गणवेश खरेदीत मोठा घोळ झाला होता... 

गतवर्षी हिमायतनगर तालुक्यातील शाळांमधून वितरीत कण्यात आलेल्या गणवेश खरेदीत मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोड करून केवळ एकच ठेकेदाराकडून पूर्ण तालुक्यातील शाळांमध्ये गणवेश खरेदी कण्यात आले होते. सदरील गणवेश हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे अनेक पालकांनी बोलून दाखविले आहे. या काभारात संबंधित शाळांचे मुख्याध्यापक यांना गटशिक्षण विभागातील अधिकार्यांनी अप्रत्यक्षपणे दबाव आणून गणवेश खरेदी करण्यास भाग पडले. यात काही मुख्याध्यापकांचा मोठा फायदाही झाला होता. त्यामुळे तेरी भी चूप..मेरी भी चूप अशी परिस्थिती उध्बवली होती. याबाबत संबंधिताना विचारण केली असता त्यांनी हात झटकून माहिती देण्यास टाळाटाळ केली होती. तीच परिस्थिती याही वर्षी उद्भवण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, या प्रकाराकडे जी.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी लक्ष द्यावे अशी रास्त अपेक्षा शिक्षण प्रेमी पालकातून व्यक्त होत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी