रंगेहाथ पकडले...

हिमायतनगर(अनिल मादसवार)बुधवारच्या आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी करणाऱ्या एका महिलेवर ब्लेडने वार करून मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पाकीटमार महिलेस नागरिकांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. हि घटना बुडवी दुपाई ३ वाजेच्या दरम्यान घडली असून, त्यासा अन्य चार महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मागील्म्हीण्यापासून येथील बुधवारच्या आठवडी बाजारात ऐड्रोइड मोबाईल, रोख रक्कम आणि महिलांच्या गळ्यातील, कानातील सोन्याचे दागिने चोरीच्या घटना भर दिवस घडत होत्या. मात्र सामान्य नागरिक याकडे दुर्लक्ष करीत तक्रार देण्यास टाळाटाळ करीत होते. मात्र १५ दिवसापूर्वी शहरातील बाजारातून तीन पत्रकारांसह शेकडो लोकांचे मोबाईल चोरी गेल्यानंतर तक्रारीचा ओघ सुरु झाला. मात्र आठवडी बाजाराच्या गस्तीसाठी नेमण्यात आलेले पोलिस कर्मचारी बाजारात गस्त घालण्याचे सोडून आपल्या घरघुती कामात जास्त लक्ष देत होते. मोबाईल चोरीच्या घटना व पोलिसांच्या हलगर्जी पणाबाबतचे वृत्त प्रकाशित होऊनही पोलिसांनी आठवडी बाजारते येणाया नागरिकांच्या सुरक्षेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.

त्यामुळे चोरट्यांचे मनोबल वाढले असून, एक आठवडा विश्रांती देऊन पुन्हा दि. १२ बुधवारी या चोरट्यांनी हिमायात्नागारच्या आठवडी बाजाराला लक्ष केले असून, आज ओजि जवळपास १२ ते १५ लोकांचे महागडे मोबाईल चोरीला गेले. त्यापैकी सुनील चव्हाण आणि प्रवीण सावंत या दोघांनी तक्रार दिली आहे. त्याच वेळी आठवडी बाजारात तालुक्यातील मौजे जिरोन येथील सौ.सुरेखा प्रभाकर वानखेडे हि महिला येथील मस्जिद जवळ भाजीपाला खरेदी करताना पाठीमागे उभी असलेल्या एका महिलेने सुरेखा यांच्या गळ्यातील पोत कापण्याच्या उद्देशाने ब्लेडने वार केला. यात सदर महिला जखमी झाली असून, घटना लक्षात येताच त्या भाजीपाला खरेदी करणाऱ्या महिलेसह बाजारातील नागरिकांनी पोत लांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेस रंगेहात पकडून चोप देऊन हिमायतनगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. तसेच हिमायतनगर पोलिसांनी तिच्या सोबत असलेल्या अन्य पाच ते सहा महिलांना संशयावरून ताब्यात घेतले आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या महिला ह्या चंद्रपूर जिल्ह्यातील असल्याचे सांगत असून, त्या हिमायतनगर च्या आठवडी बाजारात कश्यासाठी आल्या होत्या असा प्रश्न नागरिक विचारीत आहेत. या महिलांची कसून चौकशी केल्यास मोबाईल, दागिने व पाकीटमार छोट्यांचे रिकेत उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. साडील महिलांच्या पेहरावावरून त्यांच्यावर संशय घेणे हि दुरापास्त असल्याचा फायदा घेत अनेक नागरिक व महिलांचे सोने व रोख रक्कमेवर हाथ साफ केल्याचे सांगण्यात येत आहे. सदरील घटनेचे वृत्त लोहीपर्यंत ब्लेडने जखमी झालेल्या महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा नोंदविण्याची प्रकिया सुरु होती.

या चोरट्या महिलांची टोळी पकडल्याचे समजताच पोलिस स्थानकात हजारो नागरिकांनी पाहण्यासठी गर्दी केली असून, गाडीला पांगविण्यासाठी पोलिसांनी चक्क सुंदरीचा वापर केल्याचे दिसून आले आहे. एरवी चोरट्यांकडून माहिती उकळण्यासाठी वापरण्यात येणारी हि सुंदरी आज नागरिकांवर उगारल्याने स्थानकात आलेल्या नागरिकांनी पोलिसांच्या या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी