राजकीय नेत्यांचा घाट..?

हिमायतनगर(अनिल मादसवार)हिमायतनगर येथील तहसीलदार म्हणून शनिवारी पदभार स्वीकारलेले तहसीलदार आबासाहेब चौरे रुजू होताच गौण खनिज तस्करांचे धाबे दणाणले आहे. यांना काही राजकीय नेत्यांच्या जवळच्यानी हटविण्याच्या हालचाली सुरु केल्याची चर्चा सुरु आहे. तालुक्याचे जबाबदार राजकीय नेते व नंबर दोनचे धंदे करणाऱ्या माफियांनी वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न सुरु केल्याने श्री चौरे यांना रुजू होताच अवघ्या तीन तासात नांदेडला रवाना व्हावे लागल्याचे दिसून आले. त्यामुळे काही नेत्यांनाच हिमायतनगरला चांगल्या अधिकाऱ्यांचे वावडे असल्याचे उघड होत आहे. 

मागील काळात तीन वर्ष हिमायतनगर येथे नायब तहसीलदार पदी कार्यरत असताना आबासाहेब चौरे यांनी गौण खनिज माफियांना सळो कि पळो करून सोडले. दुधड सरसम या मध्य रस्त्याचे कामासाठी गुत्तेदाराने सोनारी फाटा ते दुधड रस्त्यावरील माळरानावर जेसीबी मशीनद्वारे उत्खनन करून हजारो ब्रास मुरुमाची चोरी केली. या बाबत दंड आकारल्याने संबंधित गुत्तेदारास मोठे आर्थिक झळ सोसावी लागली होती. तसेच आय.टी. आय. इमातीच्या पायाभरनीत सीरंजणी रस्त्यालगत असलेल्या खादानीतून चोरीच्या मार्गाने गौण खनिज आणल्याचा पंचनामा श्री चौरे यांनी केला होता. तसेच पवना, घारापुर, विरसनी, पोटा बु., खडकी बा. आणि टेंभी - अन्देगाव रस्त्यावरून गौण खनिज चोरणाऱ्या माफियाला रंगेहाथ पकडून कार्यवाहीसाठी आणताना श्री चौरे यांना धोका पत्करावा लागला होता. तसेच बोगस स्वाक्षर्या करून बनावट प्रमाणपत्राची विक्री करणाऱ्या दलालाचे पितळे उघडे पाडून पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला होता. यासह अनेक उल्लेखनीय काम करणाऱ्या चांगल्या अधिकायाच्या कार्याला तत्कालीन तहसीलदार यांनी खोडा घालून संबंधित गुत्तेदार तथा गौण खनिज माफियांना अभय देऊन मुसकटदाबी करण्याचा प्रयत्न केला हे सर्व श्रुत आहे. त्यांच्या अश्या धडाडीच्या कारवाया व निर्णयामुळे राजकीय वरदहस्त असलेल्या गौण खनिज माफिया, रेशन व केरोसिनचा काळा बाजार करणार्यांचे धंदे बंद होण्याची भीती निर्माण झाली होती. त्यांच्या येण्याने होणारे नुकसान टाळण्यासाठी कि काय..? त्यांना या ठिकाणाहून हटविण्याचे प्रयत्न सुरु झाले आहे.

चांगला अधिकार्यांना हाकण्याचा प्रयत्न करणार्यांना जनताच जागा दाखवेल

हिमायतनगर तालुक्यात सर्वच प्रकारच्या अवैद्य धंद्यांनी डोके वर काढले असून, यावर अंकुश ठेवण्यासारखे अधिकारी येताच त्यांना या ठिकाणाहून हटविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरुवातीला राजकीय नेत्यांकडून होत असल्याचे दिसते. कारण असाच अनुभव अनिलसिंह गौतम या पोलिस अधिकायाच्या बाबतीत शहर वासियांना आला असून, आता कर्तव्यदक्ष व पर्यावरणाबरोबर शासकीय मालमत्तेचे रक्षण, माफियांच्या मुसक्या आवळणारे तालुका दंडाधिकारी श्री चौरे यांच्या माध्यमातून येताच राजकीय नेत्यांकडून त्यांना सुद्धा या ठिकाणाहून हटविण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. हि खेदाची बाब असून, गुन्हेगार, चोरट्या व वाईट प्रवृत्तीच्या लोकांच्या सांगण्यावरून चांगला अधिकार्यांना येथून हाकलण्याचा डाव खेळणाऱ्या अश्या राजकीय नेत्यांना जनताच आगामी काळातील निवडणुकीच्या माध्यमातून जाग दाखून देईल असे मत काही पर्यावरण प्रेमी नागरिक, मतदार युवकांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना व्यक्त केली.

याबाबत श्री चौरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, मी शनिवारी दुपारी हिमायतनगर तहसीलदार पदी रुजू झालो, मात्र अवघ्या तीन तासांत मला नांदेडला बोलावण्यात आले आहे. आपल्याल्या ठिकाणाहून अन्यत्र पाठविले जात असल्याबाबत विचारले असता मला आणखी तसे काही सांगण्यात आले नसल्याचे सांगून अप्रत्यक्षपणे विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी दुजोरा दिला.

याबाबत आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, मी मुंबईला गेलो होतो, आजचा परतलो आहे. येथे कोण तहसीलदार जॉईन झाले हे, मला माहित नाही. असे असेल तर हिमायतनगर येथे चांगले काम काणारे अधिकारी राहायला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी