पैनगंगा नदीवरील बंधारा

मुरली येथील पैनगंगा नदीवरील बंधारा..
शेतकऱ्यांच्या हितासाठी की गुत्तेदाराच्या..?



हिमायतनगर(अनिल मादसवार)विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावरील मुरलीजवळ चालू असलेल्या १४ दवाज्याच्या विशाल बंधार्याचे काम गावकर्यांच्या हितासाठी कि गुत्तेदाराच्या..? असा प्रश्न परिसरातील शेतकरी व गावकरी विचारीत असून, सहस्रकुंड जालविद्दूत प्रकल्पाचा वाढता विरोध लक्षात घेता नागीकाना अंधारात ठेऊन जालविद्दूत प्रकल्पाच्या कामातील भाग म्हणून हा बंधारा बांधला जात असल्याचा आरोप परिसरातील नागरीकातून केला जात आहे.

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत पैनगंगा नदीवर १४ गेटच्या भव्य - दिव्य अश्या बांधायचे काम मागील चार वर्षापासून कासव गतीने सुरु आहे. त्याचा भार चालू वर्षातील अंदाजपत्रकीय मुल्यानुसार शासनाच्या तिजोरीवर पडत आहे. एकूण १४ गेटच्या या बंधाऱ्याच्या कामाची सुरुवात दि.१२ एपरिल २०१० रोजी करण्यात आली असून, येत्या ३० जून २०१४ रोजी संपत असल्याचे श्री कोडगे यांनी सांगितले आहे. बंधार्याची मुदत संपत आली असली तरी ५० टक्केहि  काम पूर्ण झालेले नसून, कामाचा दर्जाही ढासळला असल्याचे दिसून येत आहे. सदर बंधार्याचे काम ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या हितासाठी की अधिकारी -गुत्तेदाराच्या हितासाठी असा प्रश्न विचारीत आहेत. 

सन २०१० साली याच कामाची अंदाजपत्रकीय किंमत ०६ कोटी ०९ लाख १७ हजार इतकी होती. तर आज घडीला या कामाची किंमत ०८ कोटी ०५ लाख ९७ हजारावर गेली आहे. कासव गतीने चालू असलेल्या कामामुळे अजून दोन वर्षात या कामाची किंमत दुप्पट - तिप्पट होण्याची शक्यता आहे. विहित मुद्दतीत काम पूर्ण न केल्यास याचा भार शासनाच्या तिजोरीवर पडून अप्रत्यक्षपणे नागरिकांचा खिसा कापल्या जात असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. कामाच्या ठिकाणी दर्शनी फलकावर योजनेचे नाव, कामाची मुद्दत, अंदाजपत्रकीय रक्कम, गुत्तेदार व काम करणाऱ्या एजन्सीचे नाव, देखरेख अभियंता आदिसह सविस्तर माहिती लावणे गरजेचे आहे. मात्र सदर काम कोणाचे, किती किमतीचे व कोणत्या योजनेचे हे गुलदस्त्यात ठेऊन जनतेची दिशाभूल करून अंदाजपत्रकाला बगल देत दर्जाहीन पद्धतीने केले जात आहे. 

चौकट घेणे 

या ठिकाणी कोणतीही माहिती लावलेली अथवा संबंधिताकडून दिली जात नसल्याने शासन जनता व शेतकऱ्यांची दिशाभूल करून सहस्रकुंड जलविद्दूत प्रकल्प करण्याचा घाट तर रचला जात नाही ना..? असा सवाल पुढे येत आहे. मागील चार वर्षाच्या काळात विदर्भ - मराठवाड्यातील शेतकरी व बुडीत क्षेत्रात जाणार्या गावातील नागरिकांनी २५ मेगा वैटच्या सहस्रकुंड जलविद्दूत प्रकल्पास कडाडून विरोध केला होता. यावर खुद्द तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांनी हिमायतनगर येथे जनसुनावणी घेऊन या प्रकल्पाबाबत जनतेची भूमिका जाणून घेतली होती हे विशेष...  

याबाबत अभियंता कोडगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, सदरील बंधार्याचा सहस्रकुंड जालविद्दूत प्रकल्पाशी काही एक संबंध नसून, हा एका स्वतंत्र बंधारानिर्माण करण्यात येत आहे. मागील दोन वर्षाच्या काळात वन विभागाच्या अडचणीमुळे काम रखडल्याचे सांगून अर्धवट माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी