मान्यवर नेत्यांची मुंडेना श्रद्धांजली

केंद्रीय ग्रामविकास मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री गोपिनाथ मुंडे यांच्या अकस्मात निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. त्यांच्यासारख्या कायम हसतमुख आणि उत्साही व्यक्तीमत्वावर नियतीने अचानक केलेल्या या क्रुर आघाताने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आगोपिनाथ मुंडे राज्यातील एक लोकनेते होते. सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली आणि आज ते केंद्रीय मंत्रिपदापर्यंत पोहोचले होते. गाव, शेती, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या समस्यांची जाण असलेल्या या नेत्याच्या अकस्मात निधनाने राज्याची मोठी हानी झाली आहे. गोपिनाथ मुंडेंना माझी विनम्र श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबियांना हा मोठा धक्का सहन करण्याची शक्ती मिळो, ही ईश्वर चरणी प्रार्थना....आ. माणिकराव ठाकरे 

महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातील प्रश्नांची आणि जातीपातीच्या राजकारणाची सूक्ष्म जान असलेला लोकनेता म्हणून गोपीनाथ मुंडे यांची ख्याती होती. त्यांच्या जाण्याने कष्टकरी उसतोड कामगार, माली,धनगर,वंजारी, दलित, आदिवासी, ओबीसी, समाज पोरका झाला आहे. त्यांची जीवन शैली नेहमीच धक्का तंत्र देणारी होती. शेवटी जाताना सुद्धा त्यांनी सर्वाना धक्का दिला असून, याचे मला अतिशय दुख आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देओ अश्या शब्दात नांदेडचे आ. ओमप्रकाश पोकर्णा यांनी मुंडेना श्रद्धांजली वाहिली. 

गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधनाचे वृत्त समाजाताचे खूप दुख झाले. त्यांनी सुयोग्य नेतृत्वाने भाजपची ताकद ग्रामीण भागात वाढून लोकसभा निवडणुकीचा विजय मिळविण्यात सिंहाचा वाटा दिला होता. नुकतीच केंद्रीय ग्रामविकास मंत्रीपदाची शपथ घेऊन विकासाचा संकल्प केला होता. त्यांच्या जाण्याने मराठवाड्याचे फार मोठे नुकसान झाले असून, हे कधी भरून निघणारे नाही. त्यांच्या महान कार्याला आम्ही कधीही विसरू शकणार नाही अश्या शब्दात हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी मुंडेना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी