नांदेड जिल्‍हयाचा 74 टक्‍के निकाल

दहावी परिक्षेत नांदेड जिल्‍हयाचा 74 टक्‍के निकाल
18 शाळांचा शंभर टक्‍के तर 5 शाळांचा शून्‍य टक्‍के निकाल 
परिक्षेत मुलींनी मारली बाजी       
                         
         
नांदेड(अनिल मादसवार)महाराष्‍ट्र राज्‍य माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शिक्षण मंडळ लातूर विभागाचा निकाल मंगळवार दि.17 जुन रोजी दुपारी जाहीर करण्‍यात आला. या परिक्षेत नांदेड जिल्‍हयाने घवघवीत यश मिळविले असून नांदेड जिल्‍हयाचा निकाल 74.61 टक्‍के लागला आहे. या परिक्षेतही मुलींनी बाजी मारली आहे.
      नांदेड जिल्‍हयात 35 हजार 614 विद्यार्थ्‍यांनी परिक्षा दिली त्‍यापैकी 26 हजार 572 विद्यार्थी उत्‍तीर्ण झाले आहेत. यामध्‍ये 19 हजार 800 मलांपैकी 12 हजार 419 मुले उत्‍तीर्ण झाले असून यांची सरासरी टक्‍केवारी 71.82 अशी आहे तर 16 हजार 56 मुलींनी दहावीची परिक्षा दिली असून यापैकी 12 हजार 419 मुली उत्‍तीर्ण झाल्‍या आहेत. त्‍यांच्‍या निकालाची टक्‍केवारी 77.35 अशी आहे.
      मागच्‍या वर्षी नांदेड जिल्‍हयाचा निकाल 71 टक्‍के होता. कॉपीमुक्‍तीच्‍या जनजागृतीमुळे विद्यार्थ्‍यांनी अभ्‍यासावर लक्ष केंद्रीत केल्‍यामुळे या निकालात वाढ झाली आहे. या दहावीच्‍या परिक्षेच्‍या काळात कॉपीमुक्‍तीला आळा बसण्‍यासाठी इतर तालुक्‍याचे पर्यवेक्षक देण्‍यात आले होते. असे असतांनाही निकालात मात्र वाढ झाल्‍याचे दिसून येते. मागच्‍यावर्षी पेक्षा यावर्षी निकालात वाढ झाली आहे.
18 शाळांचा शंभर टक्‍के निकाल
दहावीच्‍या परिक्षेत नांदेड जिल्‍हयात 18 शाळांनी शंभर टक्‍के यश संपादन केले आहे. यात नांदेडच्‍या युनिव्‍हर्सल इंग्‍लीश माध्‍यमिक स्‍कूल, हजरत फातेमा कन्‍या विद्यालय इरफाननगर, ऑक्‍सफर्ड इंग्‍लीश स्‍कूल नवा मोंढा, संदीपानी पब्‍लीक स्‍कूल सुनिल नगर तरोडा बु, लीटल पब्‍लीक स्‍कूल, होलीसीटी पब्‍लीक स्‍कूल पासदगाव, टायनी एंजिल्‍स पब्‍लीक स्‍कूल लक्ष्‍मी नगर, राजश्री पब्‍लीक स्‍कूल आंबेडकर चौक लातूर फाटा (सर्व नांदेड), उर्दू हायस्‍कूल बिलोली, राजश्री छत्रपती शाहू सैनिक विद्यालय सगरोळी, गोदावरी मनार पब्‍लीक स्‍कूल शंकर नगर, माध्‍यमिक उर्दू विद्यालय कुंडलवाडी, लिटल पावर कॉनव्‍हंट बिलोली, ज्ञानसरस्‍वती इंग्‍लीश स्‍कूल देगलूर, शांतीदूत गोविंदराव पाटील माध्‍यमिक विद्यालय कंधार, सरस विद्यालय इंग्‍लीश मिडीयम स्‍कूल मांडवी ता.किनवट, सेंट मेरीज इंग्‍लीश स्‍कूल गोकुंदा ता.किनवट या शाळांचा यात समावेश आहे.
    5 शाळांचा शून्‍य टक्‍के निकाल
दहावीच्‍या परिक्षेत पाच शाळांचा शून्‍य टक्‍के निकाल लागला आहे. यात जिल्‍हा परिषद हायस्‍कूल मुलींचे मुखेड, जिल्‍हा परिषद हायस्‍कूल मुलांचे कंधार, जय महाराष्‍ट्र माध्‍यमिक विद्यालय रिसनगाव ता.लोहा, संत ज्ञानेश्‍वर विद्यालय हंगीरगा ता.उमरी व नूरजहॉं उर्दू हायस्‍कूल नायगाव या शाळांचा समावेश आहे.  
      दहावी परिक्षेत नांदेड जिल्‍हयातील शाळानिहाय टक्‍केवारी प्राप्‍त झालेल्‍या शाळांची टक्‍केवारी याप्रमाणे  शून्‍यटक्‍के 5 शाळा, 1 ते 10 टक्‍के पर्यंतच्‍या 3 शाळा, 11 ते 20 टक्‍केच्‍या 5 शाळा, 21 ते 30 टक्‍केच्‍या 5 शाळा, 31 ते 40 टक्‍केच्‍या 18 शाळा, 41 ते 50 टक्‍केच्‍या 26 शाळा, 51 ते 60 टक्‍केच्‍या 70 शाळा, 61 ते 70 टक्‍केच्‍या 129 शाळा, 71 ते 80 टक्‍केच्‍या 172 शाळा, 81 ते 90 टक्‍केच्‍या 115 शाळा, 91 ते 99 टक्‍केच्‍या 38 शाळा, तर 100 टक्‍के निकाल लागलेल्‍या 18 शाळांचा यात समोवश आहे.  
      दहावी परिक्षेत घवघवीत यश मिळविलेल्‍या विद्यार्थ्‍यांचे जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष दिलीपराव पाटील बेटमोगरेकर, मुख्‍य कार्यकारी अधिकारी अभिमन्‍यू काळे, उपाध्‍यक्ष प्रकाश राठोड, शिक्षण सभापती संजय पाटील क-हाळे, आरोग्‍य सभापती प्रविण पाटील चिखलीकर, समाज कल्‍याण सभापती मंगाराणी अंबुलगेकर, महिला व बाल कल्‍याण सभापती कौशल्‍याबाई तमशेट्टे, शिक्षणाधिकारी बी.आर.कुंडगीर यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी