सोन्यावर पडदा पडणार...?

हिमायतनगर(अनिल मादसवार)येथून जवळच असलेल्या मौजे पवन तांडा येथे शेतात सापडलेल्या चार सोन्याच्या विटांवर पडदा पडण्याची शक्यता असून, पोलिसांनी एका राजकीय व्यक्तीकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न चालू असल्याची चर्चा सर्वत्र होताना दिसून येत आहे.

बार्शीच्या दिवशी शेतात काम करणाऱ्या पवना तांडा येथील राजू शंकर पवार या युवकास चार सोन्याच्या विटा सापडल्याची चर्चा सबंध तालुकाभर पसरली. सुरक्षेच्या दृष्टीने त्या विटा त्याने त्याच्या भावाजीकडे ठेवल्याचे सांगण्यात आले. काही दिवसाने राजूने सोन्याच्या विटा मागणीसाठी भावजीकडे गेला असताना देण्यास टाळाटाळ केली. त्यावरून दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. आणि सोने सापडल्याचे प्रकरण थेट पोलिसांपर्यंत जाऊन पोहोंचले. चौकशीच्या नावखाली पोलिसांनी भेट देऊन प्रथमतः किरकोळ मारहाणीचा गुन्हा नोंदविला. त्यानंतर मात्र फियादी राजू शंकर पवार याने गुप्त धनाची फियाद दिली. सापडलेल्या सोन्याच्या विटा देण्यास टाळाटाळ करीत असून, मागितले असल्यास भांडण करीत असल्याची फिर्याद दि.०५ मी २०१४ रोजी देण्यात आली. तेंव्हापासून सदर प्रकरणी चौकशी चालू असल्याच्या बतावण्या पोलिसांकडून केल्या जात असल्या तरी यातील एक सोन्याची वीट पोलिसांनी हस्तगत केली असून, उर्वरित सोन्याच्या विटा एका राजकीय व्यक्तीकडे ठेवण्यात आले असून, त्या मंदावली करून देण्यात येणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

या ठिकाणी सापडलेल्या सोन्याचे जवळपास २० ते २५ कोटी रुपये मुल्य असल्याने हे प्रकरण जवळपास दडपण्यात पोलिस व राजकीय व्यक्ती यशस्वी होण्याची चिन्हे दिसत आहेत. सोने सापडल्याची फिर्याद देणारा राजू हा सोने मिळविण्यासाठी पोलिस ठाण्यात गेला खरा पण सोन्याच्या अंड्यावर भालत्यांचीच नजर असल्याने या सोने प्रकरणाला वाचा फुटणार कि हे प्रकरण दडपले जाणार याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे. हिमायतनगर पोलिसांकडून मात्र त्या ठिकाणी सोन्याच्या नव्हे तर मातीच्या विटा संदुकात असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे फियाद देणारा एक तर मानसिक रोगी असावा किंवा दोन्ही डोळ्यांनी आंधळा असावा असा तर्क वितर्क नागरीकातून लावला जात आहे.

प्रथमतः चौकशीला गेलेला पोलिस अधिकारी रजेवर गेल्याने सदरील प्रकरण संशयाच्या दात भोवर्यात सापडले आहे. याबाबत पोलिस निरीक्षक सुरेंद्र सोनवणे यांच्याशी संपर्क करून माहिती घेतली असता ते म्हणाले कि, तेथे सोने - बीने काही नाही, मातीच्याच विटा आहेत, परंतु प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी उद्या दि.१० रोजी फियादीच्या तक्रारीवरून पुन्हा एकदा त्या सर्व संशयिताना चौकशीला बोलावले असल्याचे सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी