हिंगोलीचा सिंह गेला...

दिल्लीचा गढ आला पण..हिंगोलीचा सिंह गेला...



हिमायतनगर(वार्ताहर)दिल्लीच्या तख्तावर आगमी २१ तारखेला नरेंद्र मोदी राजसिंहासनावर विराजमान होणार आहेत. त्यांचे कुशल नेतृत्व आणि भ्रष्टाचार-महागाई या मजबूत मुद्दे व मोडी लाटेवर  स्वार होऊन भाजपने पाच राज्यांमधून काँग्रेसला हद्दपार करून स्पष्ट बहुमत सिद्ध केले आहे. हि बाब भाजप सेनेसाठी आनंदाची आहे, परंतु हिंगोली लोकसभा निवडणुकीत सुरुवातीपासून आघाडीवर असलेले लोकसभेचे विद्यमान खा.सुभाष वानखेडे यांच्या अल्पश्या मताने पराभव पत्करावा लागल्याने गड आला पण... सिंह गेला असे म्हणण्याची वेळ आली आहे.  

सकाळी ७ वाजता मतमोजणीला सुरुवात होताच निवडणुकीच्या विजयाची महिन्याभरापासून वाट पाहणार्यांमध्ये एकच उत्सुकता होती. मतदानाच्या काळात जनसंपर्क व प्रचारात आघाडी घेतलेल्या सुभाष वानखेडे यांची मतमोजनीतही आघाडी होती, त्यानंतर वानखेडेच्या विजयाची घोषणाही झाली. त्यावरून सर्वत्र शिवसेना - भाजपच्या कार्यकर्त्यांनी फाताक्यची आतिषबाजी करीत जल्लोष साजरा केला. परंतु काही वेळानंतर शेवटच्या टप्प्यात काँग्रेसचे उमेदवार राजीव सातव यांच्या विजयाच्या बातमी सर्वाना धक्का देणारी ठरली. शेवटच्या दोन राउंडमध्ये राजीव सातव यांना दीड हजाराची आघाडी मिळून शिवसेनेच्या उमेदवाराचे मताधिक्य अचानक कमी झाले आणि अवघ्या १६०० मतांनी म्हणजेच अल्पश्या मतांनी खा.सुभाष वानखेडे यांना पराभव पत्करावा लागला आहे. 

शिवसैनिकांचा विजयाच्या जल्लोषाने आनंदोत्सव ओसंडून वाहत असताना हि बातमी सर्वांनाच थक्क करून सोडणारी ठरली आहे. काही क्षणातच शिवसैनिकांचे चेहरे हिरमुसले मात्र राज्यभरात भाजपने मारलेली ऐतिहासिक निकालाची मुसंडी मोदी लाटेचा करिष्मा जाणवत होती. दिल्लीच्या गडावर भगवा फडकला याचा आनंद द्विगुणीत करून दिल्लीचा गड आला ... परंतु हिंगोलीचा वानखेडेच्या रूपातील सिंह गेला अशी भावनिक प्रतिकिया व्यक्त होताना दिसून आली आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी