ढगाळ वातावरण

हिमायतनगर(वार्ताहर)मागील अनेक दिवसपासून वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होत असताना बुधवारी सकाळपासून आभाळात ढगांची गर्दी झाल्याने दिवसभर उन - सावलीच्या खेळाचा अनुभव बघावयास मिळाला आहे. मात्र वर्य्मुळे उडालेली धूळ व कचर्याने नागरिकांना चांगलेच त्रस्त केले आहे.

बुधवारी सकाळपासून आभाळात ढगांनी गर्दी केली होती, तरीदेखील सकाळी कोवळी किरणे देऊन उगवणाऱ्या भास्करने दिवसाची सुरुवात झाली. ऐन आठवडी बाजाराच्या गर्दीत घाम गळणार्या व्यापारी व बाजारकरुणा ढगाळ वातावरणाने दिलासा मिळाला आहे. सकाळपासून अशीच परिस्थिती झाली असून, अधून मधून ढगांची कमी - अधिक होणारी गर्दी व उन - सावलीचा खेळ चालत असताना, वादळी वार्यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले होते. या वार्याने रस्त्यावरील धुळीबरोबर केर कचराही अनेकांच्या दुकानात शिरल्याने व्यापार्याने ती साफ करताना नाकीनऊ आल्याचे चित्र बघावयास मिळाले आहे. यामुळे नागरिकही चांगलेच त्रस्त झाले असून, आभाळाच्या वातावरणाने होणार्या गर्मीने जिव कासवीस झाल्याने शीतपेयाची दुकाने खच्च खच्च भरल्याचे दिसून आले. एकूणच दिवसभर आभाळात ढगांची गर्दी राहिल्याने आजच्या तापमानात एकदम घसरण होऊन वातावरणात बदल झाल्याने काही अंशी का होईना उन्हाचा पारा कमी झाल्याने ढगांची गर्दी वाढत असल्यामुळे शेतकरी माजुरदाराणी अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तविली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी