मोबाईल टोळी सक्रिय



हिमायतनगर(वार्ताहर)शहरातील बुधवारच्या आठवडी बाजारात बाजारकरुंचे मोबाईल हैन्डसेट चोरणारी टोळी सक्रिय झाली असून, भर बाजारात १० ते १८ जणांच्या खिश्यातील मोबाईल काढून घेतल्या जात असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. या प्रकाराला स्थानिकाच्या पोलिसांचे होत असलेल्या अक्षम्य दुर्लक्ष जबाबदार असल्याचा ओप केला जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मागील अनेक महिन्यापासून शहरातील बाजारातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी दोन पोलिसांची नियुक्ती कण्यात आली आहे. मात्र आठवडी बाजारात कर्तव्यावर हजर न राहता संबंधित पोलिस घराकडे व पोलिस स्थानकात गप्पा मारत बसण्यात धन्यता मानत आहेत. परिणामी बाजारात भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना पाकीटमार व मोबाईल चोरट्यांचा फटका सहन करावा लागत आहे. मागील महिन्याभरापासून आठवडी बाजारात मोबाईल चोरट्यांची टोळी दाखल होत आहे. सकाळी १०.३० च्या पैसेंजर रेल्वेने शहरात दाखल होऊन सायंकाळच्या ०५ वाजेच्या रेल्वेने या टोळीतील काही युवक महागड्या किमतीच्या १५ ते २० मोबाईल वर डल्ला मारून पसार होत आहेत. हा प्रकार अनेकांनी पोलिसांच्या कानावर टाकला, मात्र पोलिसांनी या चोई प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. याचा फटका शहरातील तीन प्रसिद्ध पत्रकारांना बसला असून, मागील आठवड्यात परमेश्वर गोपतवाड, ज्ञानेश्वर पंदलवाड व येथील व्यापारी धन्नू सेठ, प्राध्यापक लक्ष्मण डाके, दिगंबर वानखेडे, प्रवीण सातुलवाड, गजानन काटेवाले, दिगंबर वानखेडे, यांच्यासह २० ते २५ जणांना बसला होता. तर दि.२८ च्या बुधवारच्या बाजारात नांदेड न्युज लाइव्हचे संपादक तथा पत्रकार अनिल मादसवार, सरसम येथील शिक्षक दीपक कांबळे, यांच्यासह जवळगाव येथील एक नागरिक व अन्य १० ते १५ जणांचे महागडे मोबाईल हैन्डसेट भाजीपाला खरेदी करताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी लांबविले आहेत. या बाबत चार जननी पोलिसात तक्रार दिली असून, पोलिसांनी तपासाचे आश्वासन दिले आहे.

याबाबत काहींनी भोकरचे उपविभागीय पोलिस अधिकारी कांबळे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली त्यांनी या प्रकारचा गंभीरतेने तपास लावण्याच्या सूचना पोलिस निरीक्षक सुरेंद्र सोनवणे यांना दिल्याचे सांगितले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी