चौकशी गुलदस्त्यात

हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील आदिवासी बहुल भागात येणाऱ्या गणेशवाडी ग्रामपंचायती अंतर्गत करण्यात येत असलेल्या ठक्करबाप्पा योजनेतील काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे करण्यात येत असल्याची तक्रार माजी सरपंचाने करूनही सदर कामाची चौकशी न करताच चौकशीच्या नावाखाली कार्यवाही गुलदस्त्यात ठेऊन बदली करून जाणार्या ग्रामसेवकास अभय देण्याचा प्रकार चालविल्या जात आहे. याकडे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी लक्ष देऊन निकृष्ठ कामाची वाट लावणाऱ्या संबंधित अभियंता, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंचावर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.

गणेशवाडी, गणेशवाडी तांडा, जीरोणा ग्रामपंचायत अंतर्गत ठक्कर बाप्पा योजनेतून अंतर्गत सिमेंट रस्त्याचे अनेक प्रकारची कामे केली जात आहेत. परंतु ग्रामसेवक पुपलवार, उपसरपंच बळवंत जाधव, यांनी सरपांच महिलेला अंधारात ठेऊन सदर रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे करून शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक चालविली आहे. या कामात विहीच मुरमाड दगड, नाल्याची माती - मिश्रित रेतीचा वापर करून अंदाजपत्रकाला केराची टोपली दाखविली आहे. सदरचे काम करताना गावकर्यांनी विरोध करताच एक दिवस काम बंद करून राजकीय वरद हस्ताचा आव आणत पुन्हा मनमानी पद्धतीने निकृष्ठ कामाचा सपाटा लावला आहे. त्यामुळे आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मिळालेल्या ५ लक्ष रुपयाच्या निधीचे काम लाखात करून अंदाजपत्रकाला खुंटीला टांगून अल्पावधीतच मालामाल होऊ पाहत आहेत. त्यामुळे सदरचे रस्ता पहिल्याचा पावसात पुरती वाट लागणार अशी अवस्था सुरु असलेल्या कामावरून दिसून येत आहे. यास सर्वस्वी विद्यमान ग्रामसेवक, उपसरपंच असून, वर कमाई करू पाहणाऱ्या या भ्रष्टाचार्यांवर कार्यवाही करावी अशीमागणी माजी सरपंच वामनराव जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे. याबाबतचे वृत्त प्रकाशित होऊनही प्रशासकीय यंत्रणा दोषी ग्रामसेवक, उपसरपंच, गुत्तेदारावर कोणतीच कार्यवाही करीत नसल्याने दाल मे कुछ कला है.. या म्हणीचा प्रत्यय या निकृष्ठ कामाच्या बाबतीत दिसून येत आहे. पाणी कुठे मुरात आहे, याचा शोध घेणे अतिशय गरजेचे असून, जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष मुख्य कायाकारी अधिकारी अभिमन्यु काळे यांनी याकडे जीकारीने लक्ष करून दोषीवर कार्यवाही करावी अशी मागणी विकास प्रेमी गावकऱ्यानी केली आहे. आता तरी या दोषीवर कार्यवाही होईल काय..? याकडे गणेशवाडी सह सर्व तालुका वाशियांचे लक्ष लागले आहे.

याबाबत शाखा अभियंता मुधोळकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले कि, तक्रारी झाल्या असतील, तक्रारी करणे हे तर लोकांचे कामाचा आहे. मग त्या नुसार चौकशी सुद्धा झालीच असले, माझी तब्बेत ठीक नाही, म्हणून मी बर्याच दिवसापासून हिमायतनगर तालुक्याकडे गेलेलो नाही, त्यामुळे मला काही माहित नाही, असे म्हणून संतापाच्या भरात भ्रमण ध्वनी बंद केला.

याबाबत गटविकास अधिकारी यांच्याशी विचारणा केली असता ते म्हणाले कि, पेपरवर आलेल्या बातम्यांचे कात्रण व चौकशीच्या मागणीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठून परवानगीने कार्यवाही करण्यात येईल असे, यासठी तक्रार कर्त्यांनी आमच्याकडे सुद्धा तक्रार द्यावी असेही त्यांनी सांगितले.

या कामाचे वृत्त प्रकाशित होताच ग्रामसेवकाचे धाबे दणाणले असून, अभियंता, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व राजकीय व्यक्तींच्या आशीर्वादाने सदर प्रकरणावर पडदा टाकण्यास्ठी प्रयत्न सुरु केले असून, आमचे कोणच काहीच वाकडे करू शकत नाही या अविर्भावात निकुष्ठ पद्धतीचे काम सुरूच ठेवल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी