यात्रा उत्सवास आजपासून सुरुवात

हिमायतनगर(अनिल मादसवार)प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी मौजे बोरगडी येथील मारुतीरायाच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य यात्रा उत्सव व अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सुरुवात चैत्र शुद्ध नवमी दि.०८ मंगळवार पासून झाली असून, उत्सव चैत्र प्रतिपदा दि.१६ बुधवार पर्यंत चालणार आहे. उत्सव काळात पंचक्रोशीतील भाविक - भक्तांनी उपस्थित राहून हनुमंतरायाचे व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर कमेटी गावकर्यांच्या वतीने करण्यात आले आहे. 

सदर सप्ताह कार्यक्रम हभप माधव महाराज बोरगडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे. सप्ताहभर दररोज सकाळी काकडा भजन, सकाळी ६ ते ९ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे व्यासपीठ हभप ज्ञानेश्वर माउली महाराज हे सांभाळीत आहेत. सकाळी ९ ते ११ गाथा भजन, संध्याकाळी ५.३० ते ६.३० हरिपाठ, रात्री ८.३० ते १०.३० या वेलेत्त हभप पांडुरंग महाराज येहळेगावकर, डॉ.लक्ष्मीकांत रावते, साहेबराव मारडगेकर, सुदाम महाराज पिंपळदरीकर, गणेश महाराज राठोड, निळोबा महाराज हरबलकर, भगवती महाराज सातारकर, व्यंकटेश महाराज कामारीकर, व शेवटच्या दिवशी हभप. योगेश महाराज वसमतकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. तसेच रामजन्मोत्सव कथा हभप. बाळासाहेब पांपटवार यांच्या मधुर वाणीतून केले जाऊन रामजन्मोत्सव साजरा होणार आहे.


तसेच दि.15 रोजी हनुमान जन्मोत्सवानिमित्त मंगळवारी सकाळी ५ ते ६.३० च्या वेळेत मारुतीरायाचा जन्म सोहळा व अभिषेक सोहळा पुरोहित दासा गुरु वाळके यांच्या मंत्रोच्चार वाणीतून संपन्न होणार आहे. तत्पूर्वी सकाळी 4.३० ते ६.३० या वेळेत हभप. चिन्मय महाराज यांचे हनुमान जन्मोत्सवाचे कीर्तन होईल. जन्मोत्सवानंतर दर्शनार्थी भक्तांना महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. दुसर्या दिवशी सकाळी १२ वाजता काठाल्याची हर्राशी त्यानंतर कुस्त्यांची दंगल सुरु होणार आहे. यात जिंकणाऱ्या मल्लास ४००१ रुपयाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस, दुसर्या क्रमांकास २००१ रुपये व तिसर्या क्रमांकाच्या मल्लास ११०१ रुपयाचे बक्षीस दिले जाणार आहेत. तसेच या व्यतिरिक्त अन्य 500,100, 50 च्या कुस्त्या खेळल्या जातील.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी