वानखेडेना मताधिक्याने निवडून आणू... रामभाऊ ठाकरे

सुभाष वानखेडेना मताधिक्याने निवडून आणू... रामभाऊ ठाकरे

हिमायतनगर(वार्ताहर)आगामी लोकसभा निवडणुकीत खा.सुभाष वानखेडे यांना मताधिक्याने निवडून आणून नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री बनविण्याच्या संकल्प पुर्तीला आधार देऊ असे मत रामभाऊ ठाकरे यांनी व्यक्त केले. त्यांची हिमायतनगर शिवसेना तालुका प्रमुखपदी नव्याने नियुक्ती करण्यात आल्याचे खा.सुभाष वानखेडे यांनी घोषित करताच कार्यकर्त्यांच्या सत्काराला उत्तर देताना बोलत होते. त्यांच्या या निवडीमुळे रामभाऊ समर्थक युवकांमध्ये उत्साह संचारला असून, शहर व ग्रामीण भागातील नागरिक, शुभचीन्तकांकडून ठाकरेवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

हिमायतनगर तालुक्यात शिवसेना तालुका प्रमुख पदी डॉ. प्रकाश वानखेडे हे आहेत, त्यांच्या जोडीला आता रामभाऊ ठाकरे यांची साथ मिळाली आहे. रामभाऊ ठाकरे हे हिमायतनगर तालुक्यातील युकांचे प्रेरणास्थान असून, त्यांच्या हिंदुत्ववादी कार्यामुळे शहरासह ग्रामीण भागात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मागील अनेक वर्षापासून ते राजकारणात सक्रिय असून, ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत होते. आज घडीला त्यांच्या सुविद्ध पत्नी शिवानीताई ठाकरे या ग्रामपंचायत सदस्य आहेत. रामभाऊ ठाकरे यांनी मागील काळात दोन वेळा जी.प.ची अपक्ष निवडणूक लढविली होती. एक वेळा त्यांचा अवघ्या काही मतांनी निसटता परभव झाला. तर दुसर्यांदा त्यांच्या पत्नी निवडणूक रिंगणात असताना अल्पश्या मताने पराभव पत्करावा लागला होते. परंतु त्यांनी अजूनही हार न मानता एकनिष्ठेने सक्रिय होते. त्यांच्या या कार्याची दाखल घेवून खा.सुभास वानखेडे यांनी त्यांच्यावर हिमायतनगर तालुका प्रमुख पदाची जबाबदारी टाकल्यामुळे रामभाऊ ठाकरे यांना आणखीन हुरूप आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत खा. सुभाष वानखेडे यांना निवडून आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणार असल्याचे नांदेड न्युज लाइव्ह्शि बोलताना सांगितले. यावेळी बंडू पाटील टेंभीकर, डॉ.प्रकाश वानखेडे, हनुसिंघ ठाकूर, अनिल भोरे, ज्ञानेश्वर शिंदे, राम नरवाडे, खंडू चव्हाण, शंकर पाटील, रामदास रामदिनवार, पंडित ढोणे, जावेद खतीब, श्याम जक्कलवाड, गंगाधर बासेवाड, केवळदास सेवनकर, फुलके, आदींसह अनेकांनी पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी